Pages

Wednesday, September 23, 2009

सुटलेल्या पोटांची राजगड स्वारी !

रात्रीचे ९ वाजलेत, तंगड्या गळ्यात आल्यात.. पण आज जी मजा केलीय ती सांगाविशी वाटतेय म्हणून लिहितोय. आज मोने, गोगटे, रानडे आणि मी यांनी राजगड सर केला. रत्नागिरीजवळच्या कोतवड्याचे, १०० किलोच्या गटात लवकरच दाखल होतील असे, वृषभ राशीचे ideal उदाहरण असलेले मोने (मंदार), आमच्या ग्रुपमधले (अति)हुशार, आपली बाजू कधीही पडू न देणारे, पण नेहमी द्विधेत रहाणारे असे गोगटे (समीर), कोणत्याही गोष्टीची "बरं आहे" यावर तारीफ न करणारे आणि प्रत्येक गोष्ट चुकीच्या वेळी आणि ठिकाणी बोलणारे असे रानडे (कपिल) आणि मी.