Pages

Monday, April 18, 2011

अमेरिकन पुराण..!

काल भेटलेल्या एका अमेरिकन माणसाने आज मला पुन्हा लिहायला प्रवृत्त केलंय...

काल मी आमच्या घराजवळच्या एका दुकानात गेलो होतो. General सामान घ्यायला. दुकानाचे नाव "CFM"... सामानाचे बिल द्यायला मी Counter पाशी उभा होतो.
माझ्या बाजूला साधारण साठीचे एक गृहस्थ उभे होते. मी माझे पाकीट काढले आणि पैसे देऊ लागलो. त्यांनी माझ्या पाकिटाकडे बघितले आणि म्हणाले "Is that the Buddha?"
मी चकितच झालो... मी म्हणालो "No..."
ते म्हणाले "Ok.. then...are you Hindu? Is this Hindu God? Saraswati?"
मी वेडाच झालो.... म्हणालो... "Yes... I am Hindu... and he is Hindu God, Ganapati..... Sri Ganesh.. Sri Siddhi Vinayak...."!

Monday, April 04, 2011

मुंबई टू पाताळ व्हाया पॅरीस !

आणि, पहाटे पाच वाजता मी प्लेनच्या toilet चा दरवाजा ऊघडण्याची खटपट करत होतो. प्रत्येक गोष्ट काही वेगळीच वाटत होती.

ज्या मिनिटाला मी मुंबई विमानतळात गेलो तेव्हापासून सगळ्या विचित्र गोष्टी होणं चालू झालं. माझ्याकडे तिकिटाची ऑफिसातून काढलेली प्रिंट होती. "विमानाचे तिकिट आणि इतके फालतू?" इथपासून माझ्या डोक्याच्या भुंग्याची पहाट झाली. या प्रवासात मी एकटाच होतो... बरोबर कोणी नव्हते... जरा चुकल्यासारखं वाटत होतं. पण काही इलाज नव्हता.

Monday, August 23, 2010

ख ख खानातला....!

मला सांगायला खूप... म्हणजे अगदी खूप लाज वाटतेय...... पण...पण, मी "माय नेम इज खान" पाहिला...... हो, माहितेय मला, तो रिलीज होऊन काळ लोटलाय... पण याच्यापेक्षा किती लवकर बघणार ??.... बरं.. हेही सांगतो की तो पिक्चर, मी अगदी पूर्ण पाहिला......सांगायला एव्हढी लाज वाटतेय... अगदी इश्श वगैरे पण म्हणालो असतो.... पण डायरेक्टर करण जोहर ने चुकून हा ब्लॉग वाचला तर भलतंच काहीतरी समजायचा.....आणि "दोस्ताना-पार्ट २" ("घणा याराणा" म्हणू हवं तर) साठी विचारायचा.....असो.... या सगळ्यात जमेची बाजू म्हणजे, मी तो पायरसी करून पाहिला..... म्हणजे एक दमडीही न दवडता !!

Tuesday, July 20, 2010

गोष्ट एका गूढाची - ३

------पूर्वसूत्र--------------------------------------
राहुल आणि कुणाल आमचे दोन मित्र, आज आमच्यासोबत नव्हते.... मे महिन्यात राहुलने आणि जून मध्ये कुणालने आत्महत्या केली........

राहुल गेला, तेव्हा त्याचा मृत्यू ही आत्महत्या नव्हती, असं कुणालला सारखं वाटत होतं.... आणि म्हणूनच, कुणाल आणि आम्ही, राहुलचे तीन मित्र (राकेश, अभि आणि मी), त्याच्या मृत्यूचं खरं कारण शोधत होतो आणि त्यासाठी सामान्य चौकटीत बसणार नाहीत अशा गोष्टी करत होतो... आम्ही पुन्हा एकदा पहाटे राहुलच्या घरात गेलो... हातांचे ठसे घेण्यासाठी.... पण यावेळेस तिथे आम्ही एकटे नव्हतो.... कोणितरी आमच्या मागावर होतं... नक्कीच काहितरी गडबड होती..... कुणालच्या घरी परत पोहोचल्यावर, आम्ही त्यानेच बनवलेल्या सॉफ्टवेरमध्ये फिंगरप्रिंट्स तपासत होतो.......

नुकताच अमेरिकेहून आलेला सागर, मी सांगत असलेली ही सगळी गोष्ट अगदी बारकाईने ऐकत होता.....
--------------------------------------------------

Monday, May 31, 2010

गोष्ट एका गूढाची - २


------पूर्वसूत्र--------------------------------------
........ सागर, आमचा मित्र जो इतके दिवस अमेरिकेत होता, त्याला गेल्या एक दोन महिन्यात घडलेल्या घटनांविषयी मी सांगत होतो.......साधारण महिनाभरापूर्वी आमच्या एका मित्राने-राहुलने आत्महत्या केली..... राहुलचा आणि आमचा जवळचा मित्र म्हणजे कुणाल..... त्याला ही आत्महत्या वाटत नव्हती..... त्याच्याच सांगण्यावरून, आम्ही, अगदी तुमच्यासारखेच, नोकरी आणि घर या Infinite चक्रात अडकलेले चौघे मित्र - राकेश, अभिजीत, मी आणि तो एका वेगळ्याच प्रवासाला निघालो होतो... एका पहाटे साधारण तीन-चार वाजता आम्ही राहुलच्या घरी "काही वेगळं" मिळतय का हे बघायला गेलो होतो..... आणि नेमकं तसंच काही कुणालला सापडलं होतं....... कुणालच्या घरी परत आल्यावर तो आम्हाला सांगत होता.......
--------------------------------------------------