Pages

Saturday, March 10, 2012

|| सम्राज्ञी ||

तर, २२ जणांचा एक ग्रुप गुरुवारी संध्याकाळी मुंबईहून निघाला.....नागझिराला जाण्यासाठी...Twine Outdoors नावाच्या एका ग्रुपने organize केलेली ही एक टूर.
त्या बाविसात सात ते पन्नाशीपर्यंत सगळे वयोगट होते. त्यातले साधारण डझनभर CA लोक..! आणि एकमेकांना ओळखणारा असा साधारण १०-१२ जणांचा ग्रुप.
सगळे अर्थातच मुंबईकर, अंधेरी आणि पार्ल्यातले. प्रत्येकाकडे एखादा कॅमेरा आणि काहीजणांकडे दुर्बीण.
बरचसे Wildlife, Photography आणि Birding वाले (म्हणजे साध्या पोपटाला Rose Ringed Parakeet म्हणून चकीत करणारे). 
आम्ही (बायको आणि मी) दोघेच पुण्याहून. माझी बायकोसुद्धा Birding वाली. 
राहिलो मी... " 'माझा आवडता पक्षी' निबंधातला कावळा आणि बटण दाबले की निघतो तो फोटो" एव्हढीच काय ती पक्ष्यांशी आणि कॅमेराशी आमची ओळख...! 
तर अशा या टूरला आम्ही निघालो. बसने. पुणे - नागपूर बस.... १४ तासांचा प्रवास....!