Pages

Friday, June 22, 2012

एक लाजरा न् साजरा मुखडा..!


जगदीश खेबूडकरांची माफी मागून...!
फक्त ठळक शब्द मूळ गाण्यापासून बदलले आहेत...

--------------------------------------------------------
एक लाजरा न् साजरा मुखडा, चंद्रावानी खुलला ग
सांजा परसाकडला बसता हा जीव माझा हरला ग ! 

ह्या एकांताचा तुला इशारा कळला ग 
लाज आडवी येती मला की जीव माझा भुलला ग

नको रानी नको लाजू, लाजंमदी नको भिजू  
हितं नको तिथं जाऊ, आडोशाला उबं राहू

का.............? 
बघत्यात ! 

एक लाजरा न् साजरा मुखडा...............

--------

पोटाला विळखा, घालुन सजना, नका हो कवळुन धरू
का.............?

लुकलुक डोळं, करुन भोळं, बगतंय फुलपाखरू
कसा मिळावा पुन्हा साजनी मोका असला ग...

लाज आडवी येती मला ............. 

--------

बेजार झाले सोडा सजणा, शिरशिरी आली अंगा
का.............?

मधाचा ठेवा लुटता लुटता, बघतोय चावट भुंगा
मनात राणी तुझ्या हवेचा झोका झुलला ग

लाज आडवी येती मला ............. 

--------

डोळं रोखुन, थोडं वाकुन, झुकू नका हो फुडं
गटर्गुम गटर्गुम करून कबूतर बघतंय माज्याकडं
लई दिसानं सखे, आज ही भोवळ आली गं...

लाज आडवी येती मला .............
--------------------------------------------------------
 

 


 


Saturday, March 10, 2012

|| सम्राज्ञी ||

तर, २२ जणांचा एक ग्रुप गुरुवारी संध्याकाळी मुंबईहून निघाला.....नागझिराला जाण्यासाठी...Twine Outdoors नावाच्या एका ग्रुपने organize केलेली ही एक टूर.
त्या बाविसात सात ते पन्नाशीपर्यंत सगळे वयोगट होते. त्यातले साधारण डझनभर CA लोक..! आणि एकमेकांना ओळखणारा असा साधारण १०-१२ जणांचा ग्रुप.
सगळे अर्थातच मुंबईकर, अंधेरी आणि पार्ल्यातले. प्रत्येकाकडे एखादा कॅमेरा आणि काहीजणांकडे दुर्बीण.
बरचसे Wildlife, Photography आणि Birding वाले (म्हणजे साध्या पोपटाला Rose Ringed Parakeet म्हणून चकीत करणारे). 
आम्ही (बायको आणि मी) दोघेच पुण्याहून. माझी बायकोसुद्धा Birding वाली. 
राहिलो मी... " 'माझा आवडता पक्षी' निबंधातला कावळा आणि बटण दाबले की निघतो तो फोटो" एव्हढीच काय ती पक्ष्यांशी आणि कॅमेराशी आमची ओळख...! 
तर अशा या टूरला आम्ही निघालो. बसने. पुणे - नागपूर बस.... १४ तासांचा प्रवास....!