Pages

Monday, May 31, 2010

गोष्ट एका गूढाची - २


------पूर्वसूत्र--------------------------------------
........ सागर, आमचा मित्र जो इतके दिवस अमेरिकेत होता, त्याला गेल्या एक दोन महिन्यात घडलेल्या घटनांविषयी मी सांगत होतो.......साधारण महिनाभरापूर्वी आमच्या एका मित्राने-राहुलने आत्महत्या केली..... राहुलचा आणि आमचा जवळचा मित्र म्हणजे कुणाल..... त्याला ही आत्महत्या वाटत नव्हती..... त्याच्याच सांगण्यावरून, आम्ही, अगदी तुमच्यासारखेच, नोकरी आणि घर या Infinite चक्रात अडकलेले चौघे मित्र - राकेश, अभिजीत, मी आणि तो एका वेगळ्याच प्रवासाला निघालो होतो... एका पहाटे साधारण तीन-चार वाजता आम्ही राहुलच्या घरी "काही वेगळं" मिळतय का हे बघायला गेलो होतो..... आणि नेमकं तसंच काही कुणालला सापडलं होतं....... कुणालच्या घरी परत आल्यावर तो आम्हाला सांगत होता.......
--------------------------------------------------

Tuesday, May 18, 2010

गोष्ट एका गूढाची

"अर्धा तास झाला... पण कोणी दार ऊघडत नव्हतं. तो एवढा गाढ कसा काय झोपला होता? जागरण झालं होतं का त्याला? काहीच कळत नव्हतं... तारीख होती १३ जून. ढग दाटून आले होते. सकाळचे ९ वाजले होते तरी काळो़खी होती. सोसाट्याचा वारा आणि बोचणारी थंडी. इतकावेळ दार ठोठावून, बेल वाजवूनही तो का दार ऊघडत नव्हता? त्याचा मोबाईलही बंद होता. आमच्या मनात ऊगाचच नको नको ते विचार येत होते.

शेवटी, आम्ही कडी तोडण्याचा निर्णय घेतला. जुन्या बनावटीच्या, सागवानी लाकडाच्या दरवाजावरची, मजबूत लोखंडी कडी तोडणं काही सोपं नव्हतं. एव्हाना आजुबाजूचे लोकही जमा झाले होते. इथे रहात असलो तरी हे शहर आम्हाला आणि आम्ही या शहराला परके होतो. त्यात बॅचलर्स असल्यामुळे सगळ्यांना नकोसे होतो........