------पूर्वसूत्र--------------------------------------
........ सागर, आमचा मित्र जो इतके दिवस अमेरिकेत होता, त्याला गेल्या एक दोन महिन्यात घडलेल्या घटनांविषयी मी सांगत होतो.......साधारण महिनाभरापूर्वी आमच्या एका मित्राने-राहुलने आत्महत्या केली..... राहुलचा आणि आमचा जवळचा मित्र म्हणजे कुणाल..... त्याला ही आत्महत्या वाटत नव्हती..... त्याच्याच सांगण्यावरून, आम्ही, अगदी तुमच्यासारखेच, नोकरी आणि घर या Infinite चक्रात अडकलेले चौघे मित्र - राकेश, अभिजीत, मी आणि तो एका वेगळ्याच प्रवासाला निघालो होतो... एका पहाटे साधारण तीन-चार वाजता आम्ही राहुलच्या घरी "काही वेगळं" मिळतय का हे बघायला गेलो होतो..... आणि नेमकं तसंच काही कुणालला सापडलं होतं....... कुणालच्या घरी परत आल्यावर तो आम्हाला सांगत होता.......
--------------------------------------------------
"खिडकीतून जेव्हा आपण आत उडी मारली...... तेव्हापासूनच मी वेगवेगळ्या गोष्टी notice करू लागलो.... मला एक सांगा, राहुलची सवय काय होती??.... सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवायच्या, अगदी काहीही होवो... खालच्या खोलीतल्या टेबलावरचा तो गोल लाकडी शोपीस जमिनीवर पडला होता, मी जेव्हा वरती त्याच्या बेडरूम मध्ये गेलो तेव्हा टीव्हीचा रिमोट खुर्चीत पडला होता, दोन CDs टेबलावर नुसत्याच पडल्या होत्या आणि शेल्फमधली काही पुस्तकं उलटी ठेवली होती. "..... कुणाल..
"कुणाल... उगाच काहीतरी बोलू नको... अरे त्याची मनस्थिती काय होती??? तो जीव देण्याचा विचार करत होता.... त्यावेळी तो रिमोट जागेवर ठेवायचा विचार करेल का??? काही अक्कल आहे का तुला..... "....राकेश..
"मला वाटलाच होतं, तुम्हाला असं वाटणार... खरं सांगू, ती म्हण खरी आहे... जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही... ".... त्याचा आवाज कापरा झाला होता..."एक विचार करा.... राहुलसारखा एक अती-व्यवस्थित माणूस.. जो डोळे मिटूनही त्याच्या शेल्फवरच्या सगळ्या गोष्टींची नावं आणि जागा सांगू शकतो तो कितीही काही झालं तरी CDs हातात घेऊन तशाच टेबलावर टाकेल का?? आणि पहिली गोष्ट, मनात जीव द्यायचे विचार असताना CDs आणि पुस्तकं चाळेल का?? आणि चाळली तरी तो उलटी सुलटी टाकेल का??
आणि, रिपोर्टनुसार राहुलने आत्महत्या केली विष खाऊन.. विषाचं नाव Aconitine.. Highly poisonous with no known antidote... मला सांगा.. राहुलला हे विष कुठून मिळणार? आणि जगातली सगळी विषं सोडून त्याने हेच विष का निवडले? " जरा धीर आणून कुणाल परत बोलू लागला.
"अरे नेटवर एकदा गूगल केलं की कसलीही माहिती कळते तर विषाचं काय?... आणि एकदा डिटेल्स कळले की ते विष मिळवायला असा कितीसा वेळ लागणारे? आणि त्याने Aconitine च का निवडले.. कारण काही झालं तरी त्याला स्वत:ला संपवायचच असावं. "..... मी म्हणालो.
"आत्महत्या करण्यासाठी कोणी एव्हढा रिसर्च करेल का? आणि इतरही अनेक मार्ग आहेत.. कुठलंतरी भलतं विषच का?..... अजून एक गोष्ट विसरलो... आपण ज्या खिडकीतून आत गेलो... ती उघडी कशी होती? पोलिस जेव्हा अशा ठिकाणी जातात तेव्हा कुठलीही गोष्ट हलवत नाहीत. बरं, आणि मी त्या बंगल्याच्या मालकाला काहीतरी कारण काढून फोन केला होता..... '१३ मे नंतर तिथे कोणीही गेलं नाहीये...... घराच्या दाराची कडी फक्त लावली आम्ही येताना.... ' असं तो म्हणाला...... आणखी एक गोष्ट, राहुलच्या घरी कोणी नोकर-चाकर नव्हते... सगळी कामं तो स्वतःच करायचा..... ".... कुणाल
"आता सगळ्या गोष्टींचं explanation कसं देता येईल? " मी म्हणालो.
"Exactly....... हे बघा.. मला नाही वाटत खऱ्या जगात यापेक्षा जास्त काही मिळू शकेल.... शेरलॉक होम्स किंवा व्योमकेश बक्शीला, असतील मिळत दरवेळी वेगवेगळे क्लू..... But come on, this is real life.... आपले तर्क अगदी ढोबळ पुराव्यांवर आहेत. पण मला खरंच वाटतंय की ती आत्महत्या नव्हती.. आणि Come on... राहुलचा मृत्यू नक्की कशामुळे झाला ते कळलं तर आपल्यालाच बरं वाटेल ना..... मला असं वाटतं की त्या रात्री असं काहीसं घडलं असावं... "
"त्याच्या घरात कोणी तरी आलं... अगदी ओळखीचं..... ते दोघे खालच्या खोलीत होते... त्या माणसाने ती खिडकी उघडली, टेबलावरचा तो शोपीस हातात घेऊन खाली जमिनीवर बसला... अगदी सहज हातात तो गोल-गोल फिरवत.... गप्पा मारत........ त्यानंतर ते दोघे वरच्या खोलीत गेले..... खुर्चीत बसून त्याने टिव्ही लावला, रिमोट तसाच खुर्चीत टाकून टेबलाकडे गेला.. असंच राहुलशी कॅज्युअली गप्पा मारत त्याच्याकडे कुठल्या नवीन CDs आहेत का ते पाहिलं... शेल्फमधली पुस्तकं चाळली. गप्पा मारल्या.. आणि बहुदा जेवायलाही थांबला... आणि शेवटी जेवणामध्ये विष टाकून राहुलचा....... " कुणालला पुढे बोलता येत नव्हतं...
धीर आणून तो परत म्हणाला... "आणि मला असं वाटत नाही की राहुल एवढा विचित्र होता की जाताना त्याने मागे एक चिठ्ठीही न सोडावी... "
"असं तर नाही ना झालं... की आपण यायच्या आधी तिथे कोणीतरी येऊन गेलं???....... हे सगळं भलतीकडेच चाललंय... "........ राकेश
"बरं ठीक आहे.. समजा कुणाल तू जे म्हणतोयस ते खरं आहे.. मग पुढे काय? " इतका वेळ गप्प असलेला अभि म्हणाला.
"तेच मला तुम्हाला विचारायचं आहे..... ".. कुणाल.
"आपण सरळ पोलिसांकडे जाऊ.. त्यांना सरळ सगळं खरं काय ते सांगू.... " राकेश म्हणाला.
"CDs वर फिंगर प्रिंटस असतील... त्या जर राहुलच्या प्रिंटसशी मॅच झाल्या नाहीत तर तुझा तर्क बरोबर असावा... राहुलच्या सेलफोनवर कोणा कोणाचे फोन आले हे कळलं तर अजून दिशा मिळेल... " अभि पुढे म्हणाला..
"हो.. म्हणजे राकेश म्हणतोय त्यातही काही तथ्य आहे की नाही ते कळेल...... आणि राहुलच्या फोनची रेकॉर्डस पोलिसांनी आधीच तपासली आहेत.. त्यात त्यांना काही विशेष मिळालं नाही, असं तेव्हा ते म्हणाले होते... अर्थात आपले पोलिस म्हणजे न बोलण्यासारखा विषय आहे..... आणि CD वरच्या फिंगरप्रिंटस बद्दल तू बरोबर बोललास.. पण.. एका बाजूला कव्हर असतं..... दुसऱ्या बाजूस जिथे मिडिया असतो, तिथे.... काही मिळू शकतं.... "..... कुणाल
"पण generally CD वापरताना आपण त्या मिडियाला हात लावत नाही.. " ...... अभि..
"Guys...guys wait...... तुम्ही नुसत्या CD चा विचार का करताय? जर CD नाही तर कुठे ना कुठे असतीलच की प्रिंटस...जर आपण पोलिसांना काही सांगितलं नाही तर आपल्याला फिंगरप्रिंटस मिळणार नाहीत.. आणि जर त्यांना सांगितलं तर ते आपला जीव घेतील..... " मी म्हणालो...
"आपल्या इथल्या पोलिसांचं थोबाड बघूनच त्यांचा IQ कळतो.... आपण जर पोलिसांकडे गेलो तर आपलं 'तेलही गेले तूपही गेले.... ' व्हायचं... आणि कोण म्हणतो Fingerprints मिळवण्यासाठी पोलिसच हवेत? हे बघा.... " असं म्हणत कुणालने त्याचा लॅपटॉप आमच्यासमोर ठेवला....
"'how to get fingerprints at home'.... पहिलीच लिंक.... गूगल असताना कशाला हवेत पोलिस? अगदी स्टेप बाय स्टेप प्रोसिजर दिलीय..... आणि अजून काय पाहिजे.... "... कुणाल म्हणाला...
"पाहिजे ना बाबा.... नुसत्या प्रिंटस घेऊन काय करणारोत.... त्या राहुलच्या प्रिंटसशी मॅच कराव्या लागतील ना... त्या कशा करणार?? "... अभि.
"Don't worry about that.. माझा फायनल ईयरचा प्रोजेक्ट होता तो...... आणि असं विचित्रपणे बघायची गरज नाही.... आम्ही टेस्ट केलाय तो.... आणि तसाही तो प्रोग्रॅम आम्ही लिहिला नव्हता... इंटरनेट वरूनच ढापला होता... " कुणाल द सॉफ्टवेर इंजिनीर..
वातावरण जरा हलकं झालं होतं.... आणि त्यानंतर पुढचे दोन-तीन तास आम्ही एकमेकांचे fingerprints तपासत होतो...
अचानक डोक्यात परत विचार आला... हे काय करतोय आपण?? म्हणजे अजून कशातच काही नाही आणि आपण लोकांच्या फिंगरप्रिंटस शोधायला जातोय? पण, अगदी खरं सांगू? म्हणजे तसं चांगलं वाटणार नाही, पण नेहमीचं बोरींग लाईफ सोडून काहीतरी भलतंच करत होतो आम्ही..... मला मजा येऊ लागली होती....... राहुल गेल्याच दु:ख त्यामुळेच जरा कमी होत होतं...
पण एव्हढ्या सगळ्यात एक गोष्ट कोणाच्या डोक्यातच आली नव्हती.... Fingerprints आणायचे म्हणजे त्या जागेत परत एक फेरी!! नुसता विचार आला, तेव्हाच अंगावर शहारा आला... त्या नरकात परत एकदा जावं लागणार होतं....
दुसऱ्या दिवशी रात्री दोन वाजता परत एकदा आम्ही त्याच ठिकाणी बाइक्स लावून त्या वळणांवर चालत होतो... माझा कॅमेरा होताच बरोबर... पानांची सळसळ याखेपेस भीतिदायक वाटत नव्हती.... तिथल्या वातावरणात मागच्यावेळचा तो सुगंध तसाच होता.... काहीही विघ्न न येता आम्ही त्या वाजणाऱ्या गेटच्या आत पोहोचलो सुद्धा...
यावेळेस आम्ही जय्यद तयारीने आलो होतो. आवाज होऊ नये म्हणून पायात स्लीपर, तिथल्या ठशांत भर पडायला नको म्हणून हातात मोजे, हाताचे ठसे काढायला लागणारं सगळं सामान आणि इमरजंसी बॅटरी..... सगळं काही होतं... आता fingerprints शोधून त्या Transparent tapes वर घेण्याच काम सुरू झालं... मी माझा कॅमेरा एका कोपऱ्यात चालू ठेवून कुठे glass, painted surfaces, metal वगैरे ज्यावर ठसे मिळू शकतात का ते शोधू लागलो...
आम्ही जवळपास दीड तास ठसे घेतले..... तसे एकूण २५ ठसे घेऊन झाले... ते कुठल्या बोटांचे ठसे होते आणि ती बोटं कोणाच्या हाताची होती देव जाणे.... पण नेमके त्या रिमोटवर आणि CDs वर काही ठसे मिळाले नव्हते..... आता निघायची वेळ झाली होती... एव्हढ्यात खालच्या खिडकीपाशी काहीतरी आवाज झाला... आता हे काहीतरी विचित्रच होतं. आम्ही क्षणभर स्तब्ध झालो... डोळे आणि कान दहा पटीने जास्त काम करत होते... Emergency Torch अजूनही चालूच होता... पण खाली त्याचा प्रकाश जात नव्हता. परत सगळं शांत झालं होतं..... आणि एव्हढ्यात परत एक आवाज झाला.. तो आवाज नक्की खिडकीच्या दाराचा होता.. फक्त चार सेकंदात सगळं सामान गोळा केलं..... त्या गडबडीत मी माझा कॅमेरा बंद न करता तसाच उचलून सगळ्यांमागोमाग खाली उतरू लागलो.... आता काहीही झालं तरी तो आवाज कसला होता ते शोधून काढायलाच हवं होतं... खाली घरात काही हालचाल नव्हती... ते जे काही होतं ते खिडकीतून बाहेर गेलं असावं... खिडकीतून बाहेर बघितल्यावर एखादं मांजरच दिसावं, असं अगदी मनोमन वाटत होतं...
मी आणि कुणाल खिडकीपाशी गेलो... त्या मिट्ट काळोखात काहीही दिसत नव्हतं.... एव्हढ्यात ते करकरणारं गेट वाजलं.... भुतांवर माझा विश्वास नाही... पण जरका भूत असेल तर ते यापेक्षा जास्त घाबरवू शकत नाही....
"We are being dogged.... माझ्यामते एकच माणूस असावा... आपण चौघे आहोत.....Lets Follow "...... अभि
राकेश भीतीने अर्धा झाला होता.. पण झक मारत सगळ्यांबरोबर जाणं भाग होतं.... एक-दोन-तीन म्हणून सटासट आम्ही खिडकीतून आणि त्या गेटमधून बाहेर पडलो होतो... आम्ही बाईकच्या दिशेने झपझप चालू लागलो... त्या ओढ्याजवळ पोचतोय तोच एक बाईक चालू झाल्याचा आवाज झाला.... धावतच आम्ही आमच्या गाड्यांपर्यंत पोहोचलो.........................
गेली दहा मिनिटं आम्ही त्याचा पाठलाग करत होतो... तो माणूस वाट्टेल तसा गाडी मारत होता... एका गाडीवर अभि आणि मी... अभि गाडी चालवत होता... माझा कॅमेरा चालू होताच.... कुणाल आणि राकेश खूप मागे पडले होते... आणि तो माणूस आमच्या समोरच होता..... तोही घाबरलेलाच असावा..... गाडीचा वेग ११० पर्यंत पोहोचला होता... रस्त्यातली कुत्री जोर-जोरात भुंकत होती.... अधे-मध्ये समोर एखादी टूव्हिलर तडमडत होती... त्या वेगात खाली पडणं म्हणजे शेवटचं पडणं.... तो माणूस मात्र स्पीड वाढवतच होता.... एव्हढ्यात एका चौकात एक ट्रक आडवा आला... तो माणूस ट्रकच्या समोरून कसाबसा पुढे गेला आणि आम्ही ट्रकच्या मागच्या बाजूनं..... या पाठलागात नक्कीच कोणाचातरी जीव जाणार होता.... अभि आमची बाईक पुढच्या बाईकच्या अगदी जवळ घेऊन आला होता...... आणि एव्हढ्यात नेमका समोरच एक दूधाचा टेंपो रस्त्याच्या मधोमध जाताना दिसला....... आता टेंपोच्या डावीकडे "तो" आणि उजवीकडे आम्ही, रोड डिव्हायडरला अगदी चिकटून.... सगळेच सुसाट वेगात... आम्ही टेंपोला ओव्हरटेक करणार एव्हढ्यात समोर दोन-चार गाई डिव्हायडरच्या बाजूला बसलेल्या दिसल्या............. गाडीच्या ब्रेकचा भयानक आवाज झाला... काही कळायच्या आतच आम्ही जमिनीवर होतो... तो माणूस मात्र तिथून सटकला होता... आम्हा दोघांचेही जीव, हात-पाय आणि माझा कॅमेरा शाबूत होता.... मला खरचटलं होतं एव्हढंच...... समोरच्या गाई मात्र शांतपणे आमच्याकडे बघत होत्या....
दुसऱ्या दिवशी दुपारी परत एकदा आम्ही कुणालच्या घरी होतो. रात्रीच्या त्या प्रकारात खरचटण्यापेक्षा बरंच काही झालं होतं आणि ते सगळं दुसऱ्या दिवशी समजत होतं. माझ्या डाव्या हाताला जबरदस्त मुका मार लागला होता. अभिचा डावा पाय दुखावला होता.. साला त्या कुणालच्या भलत्या theory ने आमचा जीव जायची वेळ आली होती...
"कोण होता तो माणूस? आणि तो का पळत होता? तुम्हाला अजूनही वाटतं राहुलचा मृत्यू फक्त आत्महत्या होती? " ... कुणाल.
"I don't think so.... काहीतरी गडबड नक्कीच आहे... आपण लवकर त्या fingerprints बघूया... Lets see if we get something... ".... अभि.
आम्ही घेतलेल्या प्रत्येक fingerprint वर, ती प्रिंट कुठल्या खोलीत आणि कुठल्या वस्तूवर मिळाली ते लिहिलं होतं.. जर अख्ख्या हाताची प्रिंट असेल तर ती त्यानुसार ग्रुप केली होती.
२५ fingerprints चा आम्ही analysis करू लागलो.. सगळ्यात पहिली प्रिंट म्हणजे राहुलच्या कपाटातली सेंटच्या बाटलीवरली. ९९% ती राहुलचीच असणार, असं assumption...... त्यानंतर किचनमधल्या दोन ग्लासवरल्या प्रिंटस.... अपेक्षेप्रमाणे या प्रिंटस सेंटवरच्या प्रिंटसशी मॅच झाल्या. २५ पैकी फक्त ९ बोटांचे ठसे राहिले होते. आतापर्यंत सगळे ठसे राहुलचेच होते. उरलेल्या ९ पैकी ५ एका हाताच्या बोटांचे आणि ४ दुसऱ्या हाताच्या होते.... ठसे चारच होते कारण करंगळीचा ठसा Object वर उमटला नव्हता....... कुणालचा प्रोग्रॅम प्रिंट चेक करू लागला......
"Fingerprints do not match with the base sample... "..... ही पाच बोटं राहुलच्या हाताची नव्हती. त्यानंतर तो प्रोग्रॅम आपोआप available database मध्ये prints शोधू लागला.
त्याचा available database म्हणजे त्या दिवशी आम्ही केलेले खेळ...... म्हणजे, फक्त आम्हा चौघांचेच prints.
"Match found... " एक अलर्ट आला....
क्रमशः
superb.... can't wait for next post.
ReplyDeleteUtkantha Taanali geli aahe ..
ReplyDeleteBetter than Previous one .. tuze end ekdam mast astat.. Ekdam Hindi / Marathi serial sarakhe.. :)
Ek Number ...
ReplyDeleteLavkar next post taak...
Baaaap!
ReplyDeleteपूर्वसूत्र....hi diea awdli....garaj hoti tyachi..! ;)
baki blog as usual gr8! especially
'गेली दहा मिनिटं....'....ha para saglyat varach description ahe..!
Ani shevat tar .....taaak pudhcha bhag lavkar!
mastach...punha ekda story peak var jaun thambaliy...solid suspence create zalay ata..next post kevha? :-)
ReplyDeleteSolid.......!!
ReplyDeletepervious post shi lagech link lagli ani titkach utkantha vardhak hota..!!
next post lavkar pathav... !!
are sahi zale ahe
ReplyDeletenext post kar na patkan
amazing plot...please post the next part soon ........
ReplyDeleteटॉप क्लास !!!!
ReplyDeleteदोन्ही भागातील सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे - शेवट..
Awaiting next post..
mast ahe , nehemi pramanech ..... brilient
ReplyDeleteWow !!! Was waiting for the next part & it was worth waiting….amazed by your write up 1s again n a brilliant end….truly gr8!!! N plz don’t keep us waiting for a long for next part of your blog.
ReplyDeleteMASTCH---------- yacha Screenplay tayar kar Mast SHooT karu!!!!!
ReplyDelete1. Nice suspense creation!
ReplyDelete2. Heavily influenced by those episodic stories in "Kishor" Marathi magazine of 80s.
3. Keep sentences short bcoz reading off screen is difficult.
4. These kids lifting finger prints on their own, from crime scene, unknown to cops, when cops are already suspecting them.... Isn't it a little far-fetched? :)
5. Most importantly, where are the girls???? :) :)
this is what i call 'Sharp' !
ReplyDeletepurvsutra susutra ani paahije tevdhech aahe jhakaas...
ReplyDeleteani ho ranade saranchya direction ne shoot karaayalaa kharach majaa yeil.... i am 100% in
i am waiting for next part pls post quickly. you are great Writer.No doubt. go ahead pls.-- amit v phatak
ReplyDeleteकाय भन्नाट लिहितोस रे...अगदी भान हरपून शहारा आला तेही न समजता दोन्ही भाग अधाशासारखे वाचून काढलेत..आता येउदे पुढचा भाग...बापरे खुप कामाला लावलास तू सर्वांच्या डोक्याला!!!
ReplyDeleteg8 work done yaar....kaay sahi lihitos re tu....apan hyacha ek natak basavuya...mast...next bhaag lavkar post kar
ReplyDelete