Pages

Tuesday, July 20, 2010

गोष्ट एका गूढाची - ३

------पूर्वसूत्र--------------------------------------
राहुल आणि कुणाल आमचे दोन मित्र, आज आमच्यासोबत नव्हते.... मे महिन्यात राहुलने आणि जून मध्ये कुणालने आत्महत्या केली........

राहुल गेला, तेव्हा त्याचा मृत्यू ही आत्महत्या नव्हती, असं कुणालला सारखं वाटत होतं.... आणि म्हणूनच, कुणाल आणि आम्ही, राहुलचे तीन मित्र (राकेश, अभि आणि मी), त्याच्या मृत्यूचं खरं कारण शोधत होतो आणि त्यासाठी सामान्य चौकटीत बसणार नाहीत अशा गोष्टी करत होतो... आम्ही पुन्हा एकदा पहाटे राहुलच्या घरात गेलो... हातांचे ठसे घेण्यासाठी.... पण यावेळेस तिथे आम्ही एकटे नव्हतो.... कोणितरी आमच्या मागावर होतं... नक्कीच काहितरी गडबड होती..... कुणालच्या घरी परत पोहोचल्यावर, आम्ही त्यानेच बनवलेल्या सॉफ्टवेरमध्ये फिंगरप्रिंट्स तपासत होतो.......

नुकताच अमेरिकेहून आलेला सागर, मी सांगत असलेली ही सगळी गोष्ट अगदी बारकाईने ऐकत होता.....
--------------------------------------------------



...........२५ पैकी फक्त ९ बोटांचे ठसे राहिले होते. आत्तापर्यंत सगळे ठसे राहुलचेच होते. उरलेल्या ९ पैकी ५ एका हाताच्या बोटांचे आणि ४ दुसऱ्या हाताच्या होते.... ठसे चारच होते कारण करंगळीचा ठसा Object वर उमटला नव्हता....... कुणालचा प्रोग्रॅम प्रिंट चेक करू लागला......

"Fingerprints do not match with the base sample... "..... ही पाच बोटं राहुलच्या हाताची नव्हती. त्यानंतर तो प्रोग्रॅम आपोआप available database मध्ये prints शोधू लागला.

त्याचा available database म्हणजे त्या दिवशी आम्ही केलेले खेळ...... म्हणजे, फक्त आम्हा चौघांचेच prints.

"Match found... " एक अलर्ट आला....

त्या स्क्रीनवर माझं नाव दिसत होतं...

तो फालतू प्रोग्रॅम, ते ठसे माझे आहेत असं सांगत होता! मला काहिच सुचत नव्हतं. ते तिघेही माझ्याकडेच बघत होते...

"शक्य नाही.. माझ्या प्रिंट्स राहुलच्या घरी कशा मिळू शकतात? नक्की कुठल्या जागी मिळाल्यात माझ्या प्रिंट्स? "....मी

"वरच्या खोलीत जायच्या जीन्याला जो वरचा newel post आहे (जीन्याच्या रेलिंगचा सपोर्ट).....त्यावर एक पॉलिश्ड लाकडी गोळा आहे त्यावर........."....अभि

"हा सगळा काय प्रकार आहे बुवा..........? Explain it.........."....कुणाल

"हरामखोरा, तू माझ्यावर संशय घेतोयस? म्हणजे तुला काय म्हणायचय काय नक्की? एकतर मी तुला मदत करतोय आणि तू उलटा माझ्यावरच.......च्या मायला........." ....माझा पारा चढला होता..

"अरे तसं नाही...." कुणाल

"मग कसं ...? भडव्या, तू माझ्यावर संशय घेतोयस...????........आणि....आणि, संशय घ्यायचाच तर आम्ही तुझ्यावरही घेऊ शकतो.
पहिल्या दिवसापासून तू संशयास्पद वागतोयस. रात्री तीन वाजता, चोरासारखं, तू आम्हाला तिकडे का घेऊन गेलास होतास??? आणि तू नक्की पुरावे शोधायला गेलेलास की मिटवायला?
काय रे?? ते सगळे पुरावे पुसून आम्हाला यात गुंतवायचा प्लॅन चांगला होता तुझा...... आणि कोण तो साला मूर्ख.....लाकडावर प्रिंट घेणारा?" मी जाम भडकलो होतो... काय वाट्टेल ते बोलत होतो...

"अरे ए, गप्प बस....... तुम्हाला माहितेय मी तुम्हाला तिकडे का घेऊन गेलो होतो ते... आणि जर पुरावे मिटवायचेच होते तर मला तुमची गरज नव्हती... बाय द वे, उगाच शिव्या घालून आणि आवाज चढवून काही होणार नाहिये....आवाज मीही चढवू शकतो.... तुझ्या फिंगरप्रिंट्स मिळाल्यात तिथे.... नक्की काय प्रकार आहे ते सांगितलस तर बरं होईल....आणि त्या प्रिंट्स मीच घेतल्यायत... That post was bloody polished..."..... कुणाल..

"Explanation मागणारा तू कोण लागून गेलास रे?? आणि त्या प्रिंट्स तिथे कशा आल्या ते सांगेनच मी....पण तुझ्या डोक्यात नक्की काय चाल्लय ते सांगणं कठीण आहे... आणि तू नक्की काय काय केलयंस तेही सांगणं कठीण आहे....."......मी रागाने लाल झालो होतो... त्यात गाडीवरून पडल्यामुळे माझ्या हाताचं कोपर ठणकत होतं......

त्या हॉलमध्ये थोडावेळ शांतता पसरली... कोणीच काही बोलत नव्हतं.....माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता....

"आपण जेव्हा पहिल्यांदा राहुलच्या घरी गेलो होतो, तेव्हासुद्धा मी माझा कॅमेरा बरोबर आणला होता... मी, आपण केलेल्या प्रत्येक गोष्टीचं रेकॉर्डींग केलं आहे.....".... मी...

"काय??? कॅमेरा घेऊन..?? राहुलचा मृत्यू म्हणजे काय जोक वाटतो का तुला?" .... कुणाल...

"का? कॅमेराचा आणि जोकचा काय संबंध? तू केलेले ऊद्योग कॅमेरावर रेकॉर्ड झाले असतील म्हणून फाटलीय का तुझी??...".... माझा राग अजूनही शांत झाला नव्हता...

"कॅमेराचा आणि fingerprint चा तरी काय संबंध... ऊगाच विषय बदलू नको...तुझ्या प्रिंट्स तिथे कशा??"..... कुणाल..

"राहुलच्या घरी, जेव्हा तू वरच्या मजल्यावर गेला होतास... तेव्हा अभि आणि राकेश खालच्या हॉलमध्ये काही मिळतं का ते बघत होते... नेमकं याच वेळी मी कॅमेरा घेऊन तू काय करतोयस ते शूट करायला वरती आलो होतो....वरती अगदी जीन्याच्या टोकावरच मी ऊभा होतो....आणि बाय द वे ते शूटींग आहे माझ्या PC वर.....पहायचं असेल तर चल घरी..."...... मी

"Match found..." कुणाल काही बोलणार एव्हढ्यात पुन्हा एक अलर्ट आला......

याखेपेस, तो प्रोग्रॅम, ऊरलेल्या चार प्रिंट्स राकेशच्या हाताच्या आहेत असं सांगत होता.....

"आता बोला कुणाल साहेब... याचं काय explanation आहे??? मला तर तुझ्या Program चाच भरवसा वाटत नाही...".... मी

कुणाल राकेशकडेही संशयाने बघू लागला.... राकेश घाबरला होता... म्हणजे ज्याने आजपर्यंत ऊंदरालाही विष घातलं नसेल तो राहुलला........?

"Mr. Chemical Engineer तुम्ही बोला आता.... ते... Aconitine का काय ते, आम्हा कोणाला माहित असण्याचा प्रश्नच येत नाही. "..... कुणाल खरच वेडा झाला होता.

"हो... जगातले सगळे विष देऊन केलेले खून हे Chemical Engineers नी केलेत... बरोबर ना....?? आणि मला एक सांग... तुम्हाला का माहित असू शकत नाही Aconitine? Google आहे ना तुमचं Mr. Software Engineer..... 'Google असताना अजून काय पाहिजे??'.... huh... आणि माझे ठसे खालच्या खोलीत मिळालेत..... अजून घेतले असते तर तुमचेही मिळाले असते..."....... कुठून कोण जाणे, पण राकेशला अचानक धीर आला होता....


"बास करा आता..." अभि अचानक ओरडला...

"काय चाललय काय तुमचं? एकमेकांवर का संशय घेताय तुम्ही?? चला....घरी जाऊ आता.....या पायामुळे बसवत नाहिये मला.."....अभि

माझा राग शांत झाला नव्हता... राकेशही चिडला होता... घरी जाणंच चांगलं होतं...

------------------------------------------------------------

पायात गोळे आले होते..... मगाचपासून मी त्याच्या मागून धावत होतो....त्याचा पाठलाग करत होतो.... तो कोण होता, मला माहित नाही... त्याने मफलरने चेहरा झाकला होता... पाय दुखत होते... तोही खूप दमला होता...

कुणाल जाऊन थोडेच दिवस झाले होते.... आम्ही दुसरा मित्र गमावला होता....

माझी एक वाईट सवय आहे, झालेल्या गोष्टींचा मी खूप विचार करतो.... थोड्याच वेळापूर्वी, मी तसा काहिसा विचार करत घरी जात होतो... माझा मित्र रूमवर नव्हता.... मी रूमजवळ पोहोचलो..... दार उघडंच होतं....... मी आत गेलो.... माझा Computer चालू होता..... Computer वर पहिली गोष्टं पाहिली ती "Most recently used list"....... खिडकी उघडी होती.... मी पटकन खिडकीपाशी गेलो.... कोणीतरी तिथून पळत होता....

मी त्याच्या मागून धावत होतो... रस्त्यावरून... गल्लीबोळांतून..... मी दमलो होतो... तोही दमला होता... पण तरिही तो धावत होता. का कोणजाणे पण तो माणूस नक्कीच त्या बाईकवाल्यासारखा वाटत होता.....माझा वेग कमी झाला होता.... आम्ही एका गल्लीपाशी आलो होतो.....तिथे शेकडो गल्ल्या एकमेकाला मिळत होत्या..... तो... तो अचानक कुठेल्यातरी गल्लीत गायब झाला... मी इकडे तिकडे बघत होतो...तो कुठेच दिसत नव्हता.... माझी पूर्ण ताकद संपली होती.... मी तिथेच बसलो.......

------------------------------------------------------------

दिवस आजचा... वेळ....साधारण दुपारचे चार.....


मी:          कुणालला शेवटचं भेटलो ते 'फिंगरप्रिंट्स मॅच' केल्या त्या दिवशी......सगळे म्हणतात त्यानेही आत्महत्या केली.... पण मला नाही हे शक्य वाटत.... काहितरी गडबड नक्कीच आहे.... होय की नाही? सांग ना...

सागरः     माझं तर डोकच चालेनासं झालय.....

मी:         राहुलशी आमची ओळख तशी वर्षभराचीच..... पण तुम्ही एकमेकाला आधीपासूनच ओळखता.... काय बरोबर की नाही....?? हा... म्हणा राहुल.... स्मार्ट आणि हँडसम... त्याच्या मागे पोरींची अक्षरशः रांग लागलेली....पण तो... तो मात्र तुझ्या मैत्रीणीच्या मागे.... आणि तुझी मैत्रीण तर....... हा हा हा.... बर ते जाऊदे... राहुल... हुशार.... IIM मध्ये शिकलेला... आणि तू..... म्हणजे रागाऊ नको... पण....डोक्याने जरा कमीच.... तुमच्या त्या कंपनीत तो तुझ्या डोक्यावर येऊन बसला... आणि तू बसलास.....हलवत........ बरं, मग तू गेलास अमेरिकेत, MS करायला.... मग काय राहुलला रान मोकळंच..... तो आणि तुझी मैत्रीण भेटायचे बरेचदा.......असं आपलं लोक म्हणतात हो..... काय मग... आता चालतय का डोकं.......?....
तुला काय वाटलं मी खुल्चोट आहे.....? .....अरे... माहितेयत मला तुझ्या सगळ्या गोष्टी..........


सागरः     What ?? What do you mean?

मी:         You know what I mean...

सागरः     मी काय केलं?

मी:         इतिहासात लढाया लढल्या गेल्यात रे एखाद्या बाईवरून....... But come on.... इतिहास दहावितच संपला.... हा हा हा.... Grow up.... Tell me...isn't it the reason??.... पण...पण कुणालने काय केलं होतं रे...?? .... काय....तोही होता की काय रांगेत..... हा हा हा.....

सागरः     What non-sense.. What the hell are you talking about..?

मी:         तू बिथरलास की इंग्लिश मध्ये बोलतोस की काय?..... अरे हो विसरलोच.... फिरंग झालास ना तू......... सांग ना... अरे ए सांग ना...... का मारलस त्यांना....? बाय द वे.... मला माहितेय... तू अमेरिकेतून चार महिन्यांपूर्वीच आलायस........ अरे, असा रंग का उडालाय चेहर्‍याचा...?

सागरः     Shut up.... shut the fuck up....!
मी:         परत इंग्लिश...... हा हा हा.....

सागरः     One more word and you too......

मी:         "You too..." काय रे... बोल ना..... आता मला पण का..??? ... आधी राहुलला मारलस.... मी असं नाही म्हणत तो काही फारसा चांगला होता......पण म्हणून काय...........?? म्हणा, तुम्हा मोठ्या लोकांच्या भानगडीत मी कशाला पडू?? पण कुणालने काय केलं होतं रे तुझं...? तो तर तसा साधा होता.... आणि त्याने तर तुझ्यावर सगळ्यात जास्त विश्वास टाकला होता..... गळा कापलास ना त्याचा...?

राहुलच्या घरी आम्ही जेव्हा पहिल्यांदा गेलो होतो... तेव्हा त्या शेजारच्या घरातला बाहेरचा दिवा चालू होता.... तो कोणी केला होता रे.... ? राहुलच्या घराची ती खिडकी उघडी कशी होती रे....?

सांग की...बाईकवरून ज्याचा आम्ही पाठलाग केला तो कोण होता... तूच ना?? त्या दिवशी माझ्या घरात घुसलेला माणूस तोही तूच ना....... सांग की........

सागरः     हो...... Yes, तो मीच होतो.......... होय... झाले चार महिने मला भारतात येऊन..... आणि बाय द वे... तू सांगितलेल्या जवळपास सगळ्या गोष्टी मला आधिच माहित होत्या....Kunal mailed me..... आणि मला एक सांग..... मला खूनी ठरवायचा तू का प्रयत्न करतोयस?? आपण काही कोर्टात उभे नाहियोत....

मी:         हा हा हा.... हे मात्र लै आवडलं बघ मला........ अगदी बरोबर... आपण कोर्टात उभे नाहियोत.... मला माहितेय तू नाही खून केलास ते....... I was just kidding....

सागरः     "Huh... Just Kidding..???"

मी:         कुणालने केलेल्या प्रत्येक मेल मध्ये तू "To" मध्ये होतास आणि मी BCC मध्ये.... त्याने असं का केलं देव जाणे...

सागरः     कारण तो विश्वास ठेवायचा तुझ्यावर माझ्यापेक्षाही जास्त... !

मी:         Huh... विश्वास......आणि माझ्यावर....?

सागरः     अमेरिकेतून मी आधीच आलो.... त्याची कारणं वेगळी होती.....माझं MS ही झालं होतं... आणि पुन्हा तिथे जायला वेळही होता... गार्गीशी माझी भांडणं वाढंतच होती.... I just did not want to lose her.....

राहुल गेल्याच्या दुसर्‍या दिवसापासून कुणाल आपल्याला ईमेल पाठवतोय....

ज्या दिवशी तुम्ही पहिल्यांदा राहुलच्या घरी गेला होतात... तेव्हा मी एक तास आधीच तिथे गेलो होतो.... त्याचे शेजारी माझ्या ओळखीचे निघाले...... ते महिनाभरासाठी मुंबईला गेले होते.... त्यामुळे आजुबाजूला कोणीच नव्हत... दुसरा शेजारी तसा फारच लांब रहातो.......दारावरच्या त्या मंद लाईटचा स्विच बाहेरच होता.... दिवा लाऊन मी तुमची वाट बघत बसलो...... पण तुम्ही तिथे पोहोचलेले मला कळलंच नाही.. गेटचा जेव्हा आवाज झाला तेव्हा खूप ऊशीर झाला होता.... मी लाईट तसाच चालू ठेऊन काळोखात गेलो...... तुम्ही नक्की काय करताय ते बघायला....

राहुलच्या घराची खिडकी मी उघडली नव्हती.....

जसं सर्वाना वाटलं तसं मलाही पहिलं वाटलं... की पोलिसांनी बंद केलेली केस हा कुणाल का ऊकरतोय?... काहितरी काळंबेरं होतच....
त्यानंतर त्या केमिकलमुळे मला राकेशवर संशय येऊ लागला.... पण कितीही झालं तरी तो माणूस असलं काही करेल असं वाटत नव्हतं..... राहुलच्या ओळखीतलं तसं इतर कोणी असेल असाही संशय आला... पण शेवटी तुम्ही चौघेच डोळ्यासमोर येत होतात....

दुसर्‍यांदा तुम्ही जेव्हा खंजीरघाटीला गेलात तेव्हाही मीच तुमच्या मागून आलो होतो... पण I was too late..... मी भारतात आहे हे गार्गी सोडून कोणालाच माहित नव्हतं... आणि मला कोणाला सांगायचही नव्हतं... तिथून पळणं मला भाग होतं......

तुम्ही फिंगरप्रिंट्स पाहिल्यानंतर कुणालने मला ईमेल केलं....He said... I don't trust anyone now..... माझ्यामते तेव्हापासूनच त्याने तुला ईमेल करणं सोडून दिलं....

त्याचं शेवटचं ईमेल आलं ते तो गेला त्या दिवशी आणि साधारण त्याच वेळी..... मेलमध्ये त्याने "Mo2382" एव्हढच लिहिलं होतं.....मी खूप प्रयत्न केला त्याचा अर्थ समजण्याचा.... पण मला अर्थ कळत नव्हता....

त्यानंतर, कधीतरी एकदा... नेहमीसारखं.... तू तुझ्या ईमेल मध्ये..... तू शूट केलेल्या त्या बगळ्याचा व्हिडिओ पाठवलास....... फाईलचं नाव होतं.... Mo2761.mpg ....

बास्स.... Mo2382 चा अर्थ मला कळला होता.... तुझी काहितरी Involvement होती हे स्पष्ट होतं..... तुझा Computer पहाणं गरजेचं होतं...... तुझ्या रूममध्ये गेल्यावर पहिलं दिसलं ते भलं मोठं मॅगनेट..... त्यानंतर तुझा PC........ 'Mo2382.mpg' शोधायला मला फारसा वेळ लागला नाही...... Huh काय आश्चर्य आहे....त्या शेकडो व्हिडिओ फाईल्स मधली ती एक फाईल, कुणालने तुझ्याकडे येऊन पाहिली... पण तू ती कधीच पाहिली नाहिस.....

तुम्ही राहुलच्या घरी जेव्हा फिंगरप्रिंट्स घेत होतात, तेव्हा राकेशचा पाय चुकून तुझ्या कॅमेराला लागला.... कॅमेरा आडवा पडला.... And you happened to be in the frame.... तू इतरांच्या नकळत, मिळेल तिथे, काहितरी Spray करत होतास... आणि नंतर फडक्याने तिथे पुसत होतास.... तिथे तसा अंधार होता...पण.... तुझ्या चेहर्‍यावरली भीती स्पष्ट दिसत होती.... खरं सांग..... राहुलच्या त्या मोठ्या घरात, कोणी कुठे प्रिंट्स घ्यायच्या ते... ते तूच सांगितलंस ना सगळ्यांना?? अशा जागा जिथे तू कधीच गेला नाहीस.....आणि जिथे-जिथे तू गेला होतास...तिथे तिथे परत तूच.... प्रिंट्स पुसत.... आणि त्यातूनही जर एखाद्या जागी प्रिंट मिळाली, तर... काहितरी फालतू कारणं होतीच ready तुझ्याकडे........ नेमका त्याच वेळी मी तिकडे पोहोचलो...आणि बाकी काहिही न बघता... गडबडीत, कॅमेरा होता तसा उचलून तू माझ्या मागे लागलास !

परवा, मी कुणालच्या घरीही गेलो.... घराच्या दाराच्या लोखंडी कडीचं हँडल अडकवायचा तो हूक असतो... तो काही तिथे नव्हता....... म्हणजे आतली कडी Free to move होती..... By this time, I was trying to relate each and everything with you....... तुझ्या घरातल्या त्या मोठ्या मॅगनेटचा रोल तिथे मला कळला..... Brilliant...but not enough !!

I was shocked..... आणि तेव्हढ्यात तू आलास.... तिथून पळणं हा एकच मार्ग होता.........

मी:         Hmmmm..... मला वाटलं होतं तेव्हढा तू "तितपतच" नाहीयेस...... तू भारतात येऊन चार महिने झाले हे मला कालच कळलं.... बाकी मात्र मी मारलेले खडे होते.... आणि ते बरोब्बर लागले..... तर, तूच होतास तो Unknown Factor.....

राहुल... huh.....हुशार..साधा...मनमोकळा.... हा हा हा..... अरे, नालायक होता तो...... त्याच्या भानगडींमध्ये तो स्वतः तर गुरफटला होताच... पण मलाही तो अडकवत होता...... तो....रोज मला मोठमोठ्या हॉटेल्स मध्ये पार्टी द्यायचा.....सांग ना.... मी नाही कशाला म्हणू...?

पण नंतर मला कळलं......राहुलने, M.G. Road वरचा तो गुंड.....गफूर.... त्याच्याकडून भरपूर पैसे उधार घेतले होते.... आणि परत फेडणं त्याला जमत नव्हतं.... एव्हढ्या पैशांचं तो काय करायचा देवास ठाऊक..... तो गफूर त्याला धमकावत होता.... पोलिसांकडे जाणंही शक्य नव्हतं....शेवटी त्या हरामखोराने ते पैसे माझ्याकडे आहेत असं सांगितलं........राहुलशी मैत्री माझ्या जीवावर बेतणार होती.......मी माझा जीव कसाबसा वाचवत होतो......राहुलने मला फसवलं.. चांगलच फसवलं.......शेवटी, त्याने पुन्हा काहितरी भानगडी करून गफूरचे पैसे परत केले..... बास्स...... I had enough..... मी ठरवलं....... राहुलला संपवायचं...... आयुष्यभर गुंडापासून जीव वाचवत जगायचं नव्हतं मला......

कुणाल मात्र बिचारा...... He was knowing a little too much....... राहुल त्याचा बेस्ट फ्रेंड...... आणि मी त्याला मारलं.....बस एव्हढच समजत होतं त्याला... मूर्ख होता तो....पोलिसांकडे जायला निघाला होता... मला वाटलंच होतं तो असं काहितरी करणार....... I was prepared.... I did not want to... but.. but I had to...... There was no option.........

......

Oops, I almost forgot.... Sagar, you know a little more too.....................

--------------------------------------------------------------

अर्धा तास झाला... पण कोणी दार ऊघडत नव्हतं. सागर एवढा गाढ कसा काय झोपला होता? जागरण झालं होतं का त्याला? काहीच कळत नव्हतं... तारीख होती २० जुलै........ ढग दाटून आले होते. सकाळचे ९ वाजले होते तरी काळो़खी होती. सोसाट्याचा वारा आणि बोचणारी थंडी. इतकावेळ दार ठोठावून, बेल वाजवूनही तो का दार ऊघडत नव्हता.............?

15 comments:

  1. Good Climax.....ekandrit storyline changli ahe....keep it up!
    Waiting for more n diff stuff!

    ReplyDelete
  2. oh thats a g8 part too.....cool... i liked it the way u narrated the story...g8 job done...

    ReplyDelete
  3. Awesome!
    reminds me of - Roald Dahl!

    ReplyDelete
  4. superb climax...keep it up..

    ReplyDelete
  5. Lay Bhari ahe re...Mast vatale
    Gr8 Yaar....Wel Done.
    Keep going on....

    ReplyDelete
  6. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  7. Agadi shewat paryant sahi watali story..curiosity wadhat hoti shewatparyant...Awesome..

    Rahul la jya reson ne sampaval te itak intersting nahi watat..

    Otherwise ekdam zakas...
    म्हणजे ज्याने आजपर्यंत ऊंदरालाही विष घातलं नसेल तो राहुलला........?
    hehehe sahi :)

    ReplyDelete
  8. Thank you Shital...!

    Keep Reading :)

    ReplyDelete
  9. Suraj RayanadeMay 21, 2012 5:00 PM

    He kharach zal hot ki kay....???

    ReplyDelete
    Replies
    1. Ho na...

      Don char mudade padale tevha kuthe shant zalo...!

      :)

      Thanks,
      Kay Wattel Te

      Delete
    2. Suraj RayanadeMay 24, 2012 3:07 PM

      kay bhari ahe style... shant honyacha.... :)

      Delete
  10. khupach bhaari.
    loved it very much :)

    ReplyDelete