Pages

Monday, August 23, 2010

ख ख खानातला....!

मला सांगायला खूप... म्हणजे अगदी खूप लाज वाटतेय...... पण...पण, मी "माय नेम इज खान" पाहिला...... हो, माहितेय मला, तो रिलीज होऊन काळ लोटलाय... पण याच्यापेक्षा किती लवकर बघणार ??.... बरं.. हेही सांगतो की तो पिक्चर, मी अगदी पूर्ण पाहिला......सांगायला एव्हढी लाज वाटतेय... अगदी इश्श वगैरे पण म्हणालो असतो.... पण डायरेक्टर करण जोहर ने चुकून हा ब्लॉग वाचला तर भलतंच काहीतरी समजायचा.....आणि "दोस्ताना-पार्ट २" ("घणा याराणा" म्हणू हवं तर) साठी विचारायचा.....असो.... या सगळ्यात जमेची बाजू म्हणजे, मी तो पायरसी करून पाहिला..... म्हणजे एक दमडीही न दवडता !!



फिल्म चालू झाल्यावर "Special Thanks" आणि "Parteners" चे सोपस्कार झाले की मग "माझा आवडता कलाकार" पडद्यावर येतो... इंग्रजी, हिंदी आणि उर्दू मध्ये नाव दाखवल्याशिवाय "अशा" पिक्चरची सुरुवात कशी होणार? असो, चालायचंच.... तर पिक्चर सुरू होतो..... San Fransisco Airport वर हातात गोट्या घेऊन, मान वाकडी करून आणि वाकडा तिकडा चालत खान अवतरतो..... बरं.... एक गोष्ट मी आधीच सांगतो, मी शाहरुख खानचा डाय हाड फॅन आहे...
...तर.. रांगेत उभं राहून तो रहीमरक्षा (राम आणि रहीम आपल्यासाठी सारखेच ना) सुरू करतो..... हा एव्हढा सीन बघून मला खूप बरं वाटलं... म्हटलं व्वा..., शाहरूख खानची नॉर्मल असण्याची सगळी लक्षणं यात दिसत आहेत....... बरं असो..., तर त्याच्या समोर, बारीक डोळ्याची कोणी एक चिंकी उभी असते... त्या भाबडीला काय कळणार तो काय म्हणतोय ते...? पुढच्याच सीन मध्ये खानाची "अमेरिकन तलाशी" चालू होते... ( हातात मोजे घालून अत्यंत काळा किंवा गोरा पोलिस जेव्हा आपल्या बॉलीवूड हिरोच्या मागे जाऊन काहीतरी ( ! ) करतो आणि आपला हिरो त्यावेळी चेहर्‍यावर अशक्य भाव आणतो त्याला "अमेरिकन तलाशी" असे म्हणतात...अशा तलाशीचा शेवट शक्यतो "He is clean" म्हणून होतो... ...नको तिकडे हात घालण्याची फारच हौस बाबा या अमेरिकनना...). बरं या तलाशीत एक कार्ड सापडतं... Autism Alert... म्हणून.... झालं, जे नको होतं तेच झालं.... याखेपेसही आपल्या खानाला काहीतरी रोग आहेच..... हे मात्र फारच झालं हं.... एकही रोग शिल्लक नाही ठेवला या माणसाने.... अरे रामदेवबाबाकडे पाठवा रे याला कोणीतरी......... बरं, तरी नशीब आपला लाडका स्वाईन फ्लू माहीत नव्हता तेव्हा. नाहीतर नुसत्या नावावरच एक गाणं आलं असतं आणि त्यात डुकरांबरोबरचा डान्स..... अर्रर्र....... चुकलंच.... खान आणि डुक्कर केमिस्ट्री कशी जमायची??? आपला Asperger syndrome च बरा.... अरे हो... मेन सांगायचं राहूनच गेलं. आपल्या खानाला अमेरिकेच्या प्रेसिडंटाला भेटायचं असतं... आणि सांगायचं असतं.. "My name is Khan and I am not a terrorist...".......

तर, या सगळ्या भानगडीत खानाचे विमान चुकते... मग आता काय? बसने जायचे.....खान आहे मी... अशी सहज माघार कशी घेईन??.... बरं मग बस स्टॉपवर येऊन तो डायरीत काहीतरी "हमजैसे लोग" (म्हणजे "तो" रोग झालेले.. दुसरं काही नाही.. ) बद्दल लिहू लागतो... तर असे "हमजैसे लोग" बोलून भावना व्यक्त करू शकत नाहीत पण कागदावर लिहू शकतात....आणि मग तो म्हणतो (म्हणजे लिहितो)... "I love you, Mandira.."..... आता खान म्हटल्यावर त्याचं मंदिरावर (मंदिरा नावाच्या मुलीवर... I mean) प्रेम असणं साहजिकच आहे... "मंदिरा खान" कित्ती कित्ती छान वाटतं ना ऐकायला.... व्वा...

पुढे फ्लॅशबॅक मधल्या एका सीनमध्ये जेव्हा आपला खान "छोटा खान" असतो... तेव्हा टाळांच्या आवाजात "गणपती बप्पा मोरया" चा गजर चालू असतो... तेव्हा आपला खान त्याचे कान बंद करून जातो... खानाच्या कानांना त्रास होणारच... काय करणार हमजैसे लोगोंका Asperger syndrome.... नाईलाज को क्या विलाज...??? तरी बरं, कुठे अथर्वशीर्ष पहाटे पहाटे कानाच्या बाजूला स्पीकरवरून लावताना ऐकलं नाहीये.......नाहीतर, हमजैसे लोगोंकी पंचाईत होयची........ असो.... पुढे खानाची आई नेहमीप्रमाणे......."बता इसमे हिंदू कौन और मुसलमान कौन" वगैरे डायलॉग मारते.. अरे कधीपासून हेच बघत आलोय यार.... म्हणे "हिंदू कौन और मुसलमान कौन"....काहीतरी दुसरं दाखवा.....

पुढे खान मोठा होतो.... हातात गोटे मात्र कायमच बरं का... खानाचा छोटा भाऊ "धाकटा खान" अमेरिकेत जातो... खानाची आई वारते आणि तोही अमेरिकेत जातो. तिथे जाऊन त्याच्या भावाच्याच कंपनीत ब्युटी प्रॉडक्ट्स विकायच्या कामावर लागतो. आपल्या खानाला भडक रंगांची ऍलर्जी असते... आता परत परत सांगणार नाही "का" ते... समजून घ्या "हमजैसे लोग"....

तर असाच, ब्युटी प्रॉडक्ट्स विकता विकता आपला खान एका ब्युटी पार्लर जवळ येतो.... यावेळेस मात्र त्याच्या हातात गोट्यांऐवजी कॅमेरा असतो... हा तसा नशिबाचाच भाग........ आणि इथेच आपल्या मंदिरा अक्कांची एंट्री होते....
"डर गए?? Its OK, Look, डरनेमे कोई बुराई नही है, बस अपने डर को इतना बडा मत बना दो, की तुम्हे आगे बढनेसे रोके, All right, Bye...." मला सांगा एक अनोळखी माणूस... जो आपल्या दुकानासमोर (अमेरिकेत! ) वेड्यासारखा फिरतोय... त्याला वरती हे जे काही हिंदीतनं लिहिलंय ते बोलणार्‍या बाईला तुम्ही काय म्हणाल...?.... असो.... हिंदी पिक्चर....दुसरं काय??

तर.. आपला मोकाट सुटलेला बकरा.. में में करत... आणि मान वाकडी तिकडी करत त्या पार्लर मध्ये घुसतो.... त्यानंतर थोडीफार बकवास...... आणि मग "तेरे नैना तेरे नैना....." गाणं...... काही वर्षांपूर्वी हिलाच "ये काली काली आंखे..." म्हणत वाट्टेल तसा नाचणारा 'बाझीगर', आज अमेरिकेतल्या एका ब्युटीपार्लरमध्ये तिच्याकडून "तेरे नैना तेरे नैना....." च्या बॅकग्राऊंडवर केस कापून घेताना बघून मला एकदमच वाईट वाटलं......काय करणार.. कालाय तस्मै नमः !

त्यानंतर आपला खानबाबा (सहजवृत्तीनुसार) मंदिराच्या मागेच लागतो... "में...में.... Marry Me.. ...में....Marry Me..." करत..... बाय द वे, या मंदिरा अक्काचं आधी एक लग्न झालेलं असतं, एक लहान मुलगाही असतो... पण तिचा नवरा मात्र तिला सोडून पळून गेलेला असतो...

साधारण अर्धा तास झाला होता पिक्चर चालू होऊन..... वैतागलो होतो.... "वाचवा मला वाचवा"...... असं ओरडावंसं वाटत होतं.... पण बाहेर पाऊस पडत होता... आणि हाच एक न बघितलेला पिक्चर शिल्लक होता....

पुढे एका सीनमध्ये आपला खान मंदिराच्या मुलाला "खान" कसं म्हणावं हे शिकवत असतो. एकसारखा "From Epiglottis, from Epiglottis" म्हणत असतो.... अरे... ते बघताना माझा पारा एव्हढा चढला होता की वाटत होतं त्या मॉनिटर मध्ये घुसून त्या खानाच्या Epiglottis वर दोन बुक्के मारावेत...... अरे 'ख...ख....खाकरण्यातला' एव्हढं साधं त्याला सांगता न यावं....? काय बिशाद त्या पोराची परत चुकायची??? ....... अरे हो... पण मीच चुकलो... काही गोष्टी व्यक्त करता येत नाहीत ना Asperger syndrome वाल्यांना....

थोड्याच वेळात त्या दोघांच लग्न होतं... आणि सगळं कसं अगदी सुरळीत चाललेलं असतं.... "Mandira can we have sex please? वगैरे असे प्रश्न हा Asperger खान अगदी आरामात विचारतो... असो चालायचंच.... सहजवृत्ती दुसरं काय....

एव्हाना साधारण एका तासाचा पिक्चर झाला होता... .....

तारीख असते ९/११.... अमेरिकेवर हल्ला होतो... हल्ल्यानंतर ते गोरे आपल्या मुसलमान बांधवांवर अनन्वित अत्याचार करतात..... खान कुटुंबाच्या शेजारी राहणारा अफगाणिस्तानावर हल्ला करायला जातो आणि तिथेच "ओसामास प्यारा" होतो.... त्याच्या अंतयांत्रेपर्यंत खानाच्या हातात परत गोट्या आलेल्या असतात...

मंदीराचा मुलगा मुसलमान असल्यामुळे शाळेतल्या इतर गोर्‍या मुलांबरोबर त्याचं भांडण होतं... भांडण वाढत जातं... आणि त्यातच तो मुलगा जातो.... मंदिराला जेव्हा हे कळतं तेव्हा ती खूप चिडते... स्वतःलाच कोसते... आणि म्हणते.... "I want to die, I just want to die..." पण तिथेही आपला खान मान वाकडी करत "Ohh Mandira please don't die, please don't die...." म्हणू लागतो... तेव्हा मंदिरा अक्का जी काही भडकते... की बास्स...

मला असं वाटलं की तिने बाकीचा "माय नेम इज खान" बघूनच शेवटी हा सीन शूट केला असावा.... ती आक्रोश करत त्याला म्हणते... "Just leave me alone....छोड दो मुझे.. Please....मै तुम्हे देखना भी नही चाहती हू.... अब मुझसे नही होगा.... मै तुम्हे छोडके जा रही हू....."
अगदी खरं सांगू, सव्वा तास त्याला सहन केल्यावर मलाही अगदी असच काहीसं ओरडून सांगावंस वाटत होतं....

शेवटी खानाला पळवण्यासाठी मंदिरा त्याला President ला "My name is Khan and I am not a terrorist !" असं जाऊन सांगायला सांगते... हुशार बरं का आमची मंदू......

आता एक गाणं हवंच..... "नूर ए खुदा....नूर ए खुदा...." सुरू होतं........ काय हो.... खुदातला 'ख' पण तसाच निघतो का?? OK.... Lets not get into details...

तर President ला भेटण्यासाठी खान भटकू लागतो... असंच संध्याकाळी एका मॉटेलात (अमेरिकन ढाबा) आपला खान नमाज "पढू" लागतो... जसं सगळीकडे बघितलं जातं तसं तिथेही त्याच्याकडे लोक बघतात...... काय करणार त्याला आता... लोकांची मेंटॅलिटी एव्हढी वाईट असते ना... छ्या... !

यासगळ्यानंतर खान कुठल्याश्या गावात जाऊन एका काळ्या कुटुंबासोबत टाईमपास करतो..... शेवटी तो Los Angeles ला पोहोचतो.... प्रेसिडेंट तिथे येणार असतो.... "दुवा" करण्यासाठी तो तिथल्याच एका मशीदीत जातो आणि नेमका तेव्हाच कोणी एक मुसलमान बंधू अजून १०-१५ बंधूंना भडकवताना दिसतो... त्यानंतर "अल्ला की राह मोहब्बत, अमन की राह" वगैरे वगैरे डायलॉगबाजी झाल्यावर तो तिथून निघून जातो...

खरंच हैराण झालो होतो यार मी.... पण काय करणार.... पिक्चर पूर्ण तर करायलाच हवा.......

शेवटी अमेरिकेचा बूश अंकल Los Angeles ला येतो..... खान ओरडून ओरडून सांगतो..... My name is Khan and I am not a terrorist... आजूबाजूचे सरबरीत अमेरिकन्स... साले.... I am a terrorist असं काहीतरी ऐकतात... साले... कानात काय घालून हिंडतात देव जाणे... मग काय एकच धावपळ उडते... आणि खानाला "धर दबोचले" जाते... कैदेत टाकतात हो बिचार्‍याला... अगदी हाल हाल करतात.... मला गहिवरून येत होतं हो अगदी..... कधी संपणार हा अत्याचार....?? ( मी बर्‍याचदा फक्त माझाच विचार करतो हो.... काय करणार सवय आहे....)

नंतर लोक कुठलीतरी फालतू मिडिया रिव्हॉल्युशन घडवून त्याला सोडवतात.... खान सुटतो.... सुटतो म्हणजे अगदी मोकाट सुटतो.....मग बाकीचे लोक... मजहब, वजूद वगैरे बडबड करत पिक्चर पुढे ढकलतात... बॅकग्राऊंडला.... रोज सकाळी आपण जी ऐकतो ती बांग असतेच.... खान असाच भटकत असताना... State of Georgia मध्ये वादळ चालू झाल्याचं दिसतं.... मगाचचं ते काळं कुटुंब तिथेच रहात असतं.........

अरे ए मित्रांनो बास आता...... मी पुढे ढकलला तो पिक्चर... नाही सहन होत मला हे सगळं........... .तुम्ही अजूनही वाचताय????

पुढे गेलो तरी हा माणूस अजून खाकरतच असतो.... लोकांसमोर... कॅमेरासमोर... जिकडे तिकडे खाकरतो....... "खान From Epiglottis"..... अरे देवा..... सॉरी खुदा (अगदी Epiglottis च्या देठापासून ओरडून सांगतो....) वाचव मला.....

त्यानंतर अजून दहा पंधरा मिनिटांचा खुल्चोटपणा (हा ख आपला साधाच बरं का...?) झाल्यावर शेवटी तो मंदिरा आणि प्रेंसिडेंटला भेटतो.... सगळे टाळ्या वाजवतात, फुगे उडवतात आणि पिक्चर संपतो....

------------------------------

मी शेवट गुंडाळला असं वाटत असेल....आणि जर तुमच्यात हिम्मत असेल तर तुम्हीच तो पिक्चर पाहा आणि लिहा...... माझा patience इथेच संपला....... पण आता मला कळतंय.... पिक्चरचा रिव्यू नेहमी अर्ध्यावर का सोडतात ते.....

......बाय द वे, हाच तो महान चित्रपट जो जगाला शांतीचा संदेश देतो... ( अहो असं खरंच वाटतं लोकांना....ऊगाच नाही लोकांनी चार-पाच स्टार दिलेत...)!
हाच तो महान चित्रपट ज्याला आपले महान मुख्यमंत्री सुरक्षा देत राहिले आणि तिकडे German Bakery त कोणा फरिश्त्याने अमनका बॉम्ब लावला.
हाच तो महान चित्रपट ज्यातला महान खान, IPL मध्ये आपल्या सुहृद शेजारी पाकिस्तान्यांना भरू पहात आहे.........

अल्लाही रहम मौलाही रहम...... !

16 comments:

  1. zakaasssss..........
    Full to Timepass bar kaaa..................
    1 number lihilas.
    :)

    ReplyDelete
  2. The film is artistically mediocre and morally unpardonable. Besides, it is tremendously boring.

    Personally, I support inter-religious marriages only if no conversion out of Hinduism is involved and the children born are Hindus, with Hindu names. And no, I do not think religion is a matter of personal choice.

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. I dont like lambasting religion for fun ....
    haa ek bhaag sodlyas mala lekh aavadala..

    ReplyDelete
  5. Hats off to You Kapil, for your Outstanding Courage to watch a SRK movie.

    SRK ruined our Holy Generation!
    Let's put a Petition in Supreme Court!

    Besht post re! Hasun Hausn purevaat zali !!

    an yeah , regarding religious p.o.v. ,
    only one good'ol' line:

    "Garv Se Kaho Hum HINDU Hai!"

    ReplyDelete
  6. hahahahah..jam avadale mala :D film reviews lihayala lag ata :D :P

    ReplyDelete
  7. khanacha mast 'Kothala' kadhalas :P :D

    ReplyDelete
  8. dattatray karambelkarAugust 24, 2010 9:38 AM

    भारी मित्रा,
    साला हा लेख ज्याने कोणी लिहिलाय त्याचा मी जाहीर मुका घ्यायला तयार आहे लकडी पुलावर किंवा शनिवार वाड्यात ..
    जर लिहिणारी व्यक्ती "ती" तर तिची आई कडून ओटी भरून घेईन(इति पु.ल.देशपांडे हे सांगणे न लगे )..(jeans T -shirt घातला नसेल तरच हा ...काय आहे की आज काल T -शिरत वर ओढणीची किवा पदराची style आली नाहीये अजून.ओटी कशी भरणार ?..) असो लेख मात्र सांगलीच्या भाषेत "भागात नादखुळा" आहे..keep it up

    ReplyDelete
  9. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  10. kharach kay faltu picture hota to...me tar ardhya taasatach band kelela...tu kasa evadha sahan kelas tulach mahit :)

    by the way...lihilays ekdum jhakaas..epiglottis pasun sangte :D

    ReplyDelete
  11. Ummm...thikthak...not so good not so bad....considering previous write ups I think you can do much better than this..ya but b'coz of this came to know that no point in watching movie…keep it up!

    ReplyDelete
  12. Navin lekh lihila nahis ka re BOKYA...?

    ReplyDelete
  13. Will post something new in a few days...btw wats ur email id?

    ReplyDelete
  14. When r u going to post something new Mr. 'Kay Wattel Te'.....awaiting to read something new n interesting from you!

    ReplyDelete