Pages

Saturday, December 26, 2009

दारवा

दारवा

दारू जरा कमी पडतेय, दर वेळी वाटतं,

रिकाम्या पेल्याच्या भीतीचं, आभाळ मनात दाटतं,

तरी पावले चालत रहातात, मन चालत नाही

व्हिस्कीशिवाय शरीरामधे कुणीच बोलत नाही..

तितक्यात कुठून एक मित्र बाटली घेऊन येतो

तितक्यात कुठून एक मित्र बाटली घेऊन येतो

चकण्यातला काही भाग घशाखाली घालतो

दुसरा मित्र उनाड मुलासारखा सैरा वैरा पळत रहातो

पाना फुला झाडांवरती छपरावरती चढून पहातो

दुपार टळून संध्याकाळचा सुरू होतो पुन्हा पेग

पेग मागून चालत येते गार गार बीअरची वेळ

चक्क डोळ्यासमोर कोणी एक उलटी करून येतो

गांधी जयंतीला ग्लास मध्ये कोण दारवा भरतो



दारवा............

दारवा...

वार्‍यावर भिरभिरभिर बेवडा नवा नवा

प्रियेsssssssss दारूतही गोडवा नवा नवा

दारवा....


खोलीत सारे झुलतायत कधीचे
खोलीत सारे झुलतायत कधीचे
वोडक्यात सोडा ओततायत कधीचे
वोडक्यात सोडा ओततायत कधीचे
सोडा नको अता चला नीटच मारा भरा भरा
प्रियेsssssssssss मनातही ग्लास हा भरा भरा

दारवा...

आकाश सारे हलते का रे, आता सुगंधी झालेत वारे..
आकाश सारे हलते का रे, आता सुगंधी झालेत वारे..
पेलाभर भरभर रम भर पामरा जरा जरा
प्रियेsssssssssss बर्फातही गारवा जरा जरा

दारवा....
वार्‍यावर भिरभिरभिर बेवडा नवा नवा
प्रियेsssssssss दारूतही गोडवा नवा नवा
दारवा....

दारवा....

Saturday, December 12, 2009

हॉस्टेल हॉस्टेल - आता शेवटची टांग !

शिव्या !! हॉस्टेलचा अविभाज्य घटक. हॉस्टेलमध्ये शिव्या न देणे हे बाहेरच्या जगात अश्लील शिव्या देण्याइतकंच अत्यंत असंस्कृत मानलं जातं. पंजाब, कोल्हापूर, माझं गाव आणि हॉस्टेल इथे भारतातल्या ९५ टक्के शिव्या तयार होतात असं माझं मानणं आहे. (वाटत असल्या तरी, दक्षिणेकडल्या भाषांमध्ये जे काही बोलतात त्याला मी शिव्या मानत नाही).

Thursday, November 26, 2009

हॉस्टेल हॉस्टेल - दुसरी ती रूम !

हॉस्टेल हॉस्टेल - दुसरी ती रूम !

हॉस्टेलमध्ये जाऊन रूम न बघणे म्हणजे आग्र्यात जाऊन ताजमहाल न पहाण्यासारखं झालं. रूममध्ये प्रवेश केल्या केल्या दरवळणारा तो न धुतलेल्या सॉक्सचा सुगंध, दाराच्या डाव्या बाजूसच जुन्या काळ्या गोल सॉकेटमध्ये अडकवलेल्या पाणी तापवायच्या "रॉड"च्या तारा, प्रत्येक फेरित "कटर..कुटकुट..कुटकुट.." असा काहितरी आवाज काढणारा पंखा, तुटलेल्या हॅंडलची भली मोठी बादली, त्यात एका प्लॅस्टीकच्या "मग्ग्यात" (तांब्यात) कोंबून भरलेले साबण, G T (Glass Tressing) मारण्यासाठी खिडकीतून वजा झालेला काचेचा तुकडा, आरसा, कंगवा, दाढीचं सामान यांसारख्या गोष्टी ठेवण्यासाठी वापरलेलं प्रत्येक पुस्तक, भिंतीवरची भोकं लपवण्यासाठी लावलेली हिरॉइनची पोस्टर्स, एकाच दोरीवर लटकवलेले कमीत कमी पंचवीस कपडे, उरलेले सगळे कपडे सांभाळणारी तुटकी लाकडी खुर्ची, आजूबाजूच्या रूममधले, नुकतेच मेसमध्ये काय असेल ते ओरपून आलेले, जागा मिळेल तिथे घोरत पडलेले, ४-५ उघडेबंब कुंभकर्ण, कान फुटतील अशा "नॉर्मल" आवाजात लावलेली गाणी आणि या सगळ्यात चष्मा लावून अभ्यासाचं पुस्तक ऊघडून बसलेला त्या रूममधलाच कोणीतरी एक बिचारा, जर तुम्ही कधी पाहिला नसेल तर खरच कधी, कोणा हॉस्टेलला जा.

Friday, November 20, 2009

हॉस्टेल हॉस्टेल - पहिला मान ढेकणाचा !

हॉस्टेल हॉस्टेल - पहिला मान ढेकणाचा !

पृथ्वीवर जीवनाच्या उत्पत्तीचे सगळे सिद्धांत साफ खोटे आहेत. जीवनाची सुरूवात ही ढेकणांपासूनच झाली याची मला आणि माझ्यासारख्या हॉस्टेलाइट्सना पूर्ण खात्री आहे. ढेकूण आणि झुरळ हे प्राणी पृथ्वीच्या जन्मापासुनच सुखाने नांदत आलेत आणि पुढेही रहातील. अशा या सुखी संसारांमध्ये पाहुणे म्हणून मी आणि माझे पार्टनर, 1st year ला, हॉस्टेलच्या रूमवर रहायला गेलो.

Wednesday, October 14, 2009

प्रेमा तुझा रंग कसा?

प्रेमा तुझा रंग कसा ?

प्रत्येक माणूस प्रेम करतो. प्रत्येकाची प्रेम करायची स्टाईल वेगळी असते आणि प्रत्येकाच्या प्रेमाचा रंगही वेगळा असतो.

तांबडा !

"मै तुम्हारेलिये जान दे भी सकता हू और ले भी सकता हू" हे या तांबड्या प्रेमींचं ब्रीदवाक्य. या तांबड्यांच्या गाडीचा रंग पिवळा किंवा फ्लुरोसंट पोपटी असतो. यांचं प्रेम म्हणजे एकदम extreme असतं. एकदा प्रेमात पडले तर त्यांना दुसरं काही दिसत नाही. यांचा माथा नेहमीच गरम असतो. यांना आवडणार्‍या व्यक्तीकडे दुसर्‍या कोणी फक्त बघितलं तरी यांच लाल-लाल रक्त ऊकळू लागतं. दुसरं कोणी आपल्या वाटेत येऊ नये यासाठी ते काहीही करू शकतात. परवा अशाच एका तांबड्या प्रेमीकडून मार खाल्लेल्या माझ्या मित्राला भेटून आलो. बिचारा तंगड्या गळ्यात घेऊन फिरतोय. मला नाही वाटत तो परत कधी त्या मुलीकडे राखी बांधून घ्यायला सुधा जाईल!

Monday, October 05, 2009

द्राविडी दहशत

मॅच बघतोय हो.... भारत विरूद्ध पाकिस्तान......पाकड्यांनी ३०२ धावा कुटल्यात... अत्ता, द्रविड बॅटिंग करतोय आणि त्यामुळेच मी लिहिण्यास "मजबूर" झालोय...

2nd Inning असल्याने सचिन नेहमीप्रमाणे Pressure खाली आऊट झालाय. त्याला नक्की कसलं Pressure येतं कोण जाणे...लगेच मैदानाबाहेर?? म्हणूनच की काय कुणास ठाऊक, पण सचिनने ५०-५० Overs ची वन डे मॅच २५ च्या चार Innings मधे करावी असं सुचवलं आहे.. जास्त वेळा Pressure हलकं करायला जाता येईल :P

Wednesday, September 23, 2009

सुटलेल्या पोटांची राजगड स्वारी !

रात्रीचे ९ वाजलेत, तंगड्या गळ्यात आल्यात.. पण आज जी मजा केलीय ती सांगाविशी वाटतेय म्हणून लिहितोय. आज मोने, गोगटे, रानडे आणि मी यांनी राजगड सर केला. रत्नागिरीजवळच्या कोतवड्याचे, १०० किलोच्या गटात लवकरच दाखल होतील असे, वृषभ राशीचे ideal उदाहरण असलेले मोने (मंदार), आमच्या ग्रुपमधले (अति)हुशार, आपली बाजू कधीही पडू न देणारे, पण नेहमी द्विधेत रहाणारे असे गोगटे (समीर), कोणत्याही गोष्टीची "बरं आहे" यावर तारीफ न करणारे आणि प्रत्येक गोष्ट चुकीच्या वेळी आणि ठिकाणी बोलणारे असे रानडे (कपिल) आणि मी.