Pages

Wednesday, October 14, 2009

प्रेमा तुझा रंग कसा?

प्रेमा तुझा रंग कसा ?

प्रत्येक माणूस प्रेम करतो. प्रत्येकाची प्रेम करायची स्टाईल वेगळी असते आणि प्रत्येकाच्या प्रेमाचा रंगही वेगळा असतो.

तांबडा !

"मै तुम्हारेलिये जान दे भी सकता हू और ले भी सकता हू" हे या तांबड्या प्रेमींचं ब्रीदवाक्य. या तांबड्यांच्या गाडीचा रंग पिवळा किंवा फ्लुरोसंट पोपटी असतो. यांचं प्रेम म्हणजे एकदम extreme असतं. एकदा प्रेमात पडले तर त्यांना दुसरं काही दिसत नाही. यांचा माथा नेहमीच गरम असतो. यांना आवडणार्‍या व्यक्तीकडे दुसर्‍या कोणी फक्त बघितलं तरी यांच लाल-लाल रक्त ऊकळू लागतं. दुसरं कोणी आपल्या वाटेत येऊ नये यासाठी ते काहीही करू शकतात. परवा अशाच एका तांबड्या प्रेमीकडून मार खाल्लेल्या माझ्या मित्राला भेटून आलो. बिचारा तंगड्या गळ्यात घेऊन फिरतोय. मला नाही वाटत तो परत कधी त्या मुलीकडे राखी बांधून घ्यायला सुधा जाईल!

Monday, October 05, 2009

द्राविडी दहशत

मॅच बघतोय हो.... भारत विरूद्ध पाकिस्तान......पाकड्यांनी ३०२ धावा कुटल्यात... अत्ता, द्रविड बॅटिंग करतोय आणि त्यामुळेच मी लिहिण्यास "मजबूर" झालोय...

2nd Inning असल्याने सचिन नेहमीप्रमाणे Pressure खाली आऊट झालाय. त्याला नक्की कसलं Pressure येतं कोण जाणे...लगेच मैदानाबाहेर?? म्हणूनच की काय कुणास ठाऊक, पण सचिनने ५०-५० Overs ची वन डे मॅच २५ च्या चार Innings मधे करावी असं सुचवलं आहे.. जास्त वेळा Pressure हलकं करायला जाता येईल :P