२०१४ मध्ये लिहिलेली एक मुलाखत
==========================
परवाच पार्ल्यातल्या जीवन हॉटेलमध्ये गरम गरम चहा मारत बसलो होतो. एकटाच होतो. दिवस फार कटकटीचा गेला होता.
शेजारच्या टेबलावर कोणीतरी तीन तरूण बसले होते. पार्ल्यातलेच असावेत. फारच मोठ्या मोठ्यानं गप्पा मारत होते. त्यामुळे मी जरा त्रासूनच त्यांच्याकडे बघू लागलो. सहाजिकच त्यांच्या बडबडीकडे माझे लक्ष गेले.
"ताडोबाला हे लोक अक्षरशः पोटभर जेवले. वाघडोह मेल पंधरा मिनिटं.." त्यातला एक जण म्हणाला.
मला काही कळेना. मी जरा नीट ऐकू लागलो.
"लास्ट बॅचचा बर्ड काऊंट शंभराच्या वर गेला. एकदम खूष होतं पब्लिक." दुसरा टिवल्या बावल्या करत होता.
"ए लोक्या, पुढच्या सिझनला कान्हा नक्की रे. आणि नागरहोळ पण. मस्त जंगल आहे तिथलं. पायलटचे हे फोटोज आणलेत, बघ रे तू फक्त. एकदम कडक." तिसरा कॅमेरा काढत म्हणाला.
आता मात्र माझ्या त्रासिक नजरेची जागा कुतुहलाने घेतली. वाईल्ड लाईफ बद्दल ते काहीतरी बोलत होते हे कळलं पण ही बॅच, ती बॅच वगैरे असं काय बोलत होते ते कळेना.
"अरे बाप फोटो आहे रे हा. बोले तो एकदम झक्कास. आणि त्या वाघिणीचा कॅटवॉक.. च्यामारी.. अफलातून.." कॅमेराकडे बघत पहिला ओरडला.
इतक्या वेडेपणाने ते तिघे बोलत होते की मला पण तो फोटो आणि वाघिणीचा व्हिडियो बघावासा वाटला.
"ए ऐका ऐका, विजयनगरच्या ऑफिसमध्ये हा फोटो लावू. भिंतीवर एकदम सुंदर दिसेल." हातवारे करत तिघांतला एक पुढे म्हणाला.
"पुण्यातपण ऑफीस सुरू करायचं रे लवकर. साला बिझनेस चांगला वाढेल त्यामुळे."
बिझनेस म्हटल्यावर आता मला थोडी कल्पना येऊ लागली. यांची मुलाखत घ्यायचीच असं मी ठरवलं.
आता तुम्ही म्हणाल मुलाखत कुठुन आली मध्येच?
तुम्हाला खोटं वाटेल पण मला एक वेगळीच सवय आहे. कोणी जगावेगळी गोष्ट करताना दिसलं तर मी सरळ त्याच्याशी बोलायला जातो आणि चक्क त्याची मुलाखत घेतो. आतापर्यंत अशा चाळीस मुलाखती घेतल्यायत मी. ही एकेचाळीसावी असणार हे जवळपास नक्कीच झालं होतं.
"माफ करा हं, पण मी तुमच्या गप्पा ऐकल्या. जंगल आणि बिझनेस या तशा दोन विसंगत गोष्टींबद्दल तुम्ही काहितरी बोलत होतात, खूप interesting वाटलं म्हणून तुम्हाला जरा त्रास देतोय." मी त्याची बडबड थांबवत विचारलं.
"छे छे, त्रास कसला. सवय आहे आम्हाला. जस्ट जॉइन इन. हा लोकेश, हा विदा आणि मी अर्चिस." हा अर्चिस, आम्ही अगदी बालवाडीपासून एकत्र असल्यासारखं, बिनधास्त बोलू लागला.
"नमस्कार. सॉरी तसा जरा त्रासच देतोय.. पण मला तुमची मुलाखत घ्यायची आहे."
मुलाखत म्हटल्यावर तिघांनी मांजरासारखे (की वाघासारखे?) कान टवकारले.
"मुलाखत वगैरे काय? आम्ही कधी मुलाखत नाही दिली बुवा. पत्रकार वगैरे आहात की काय?" लोकेश म्हणाला.
"नाही नाही. माझा छंद आहे तो." तिघांच्या कपाळावरच्या प्रश्नचिन्हाकडे बघत मी म्हणालो. हे काय मला नवीन नव्हतं. पण मला पुढची reaction बघायची होती.
"वा वा.. पहिल्यांदाच ऐकला असा छंद. चांगलं आहे. पण मुलाखत वगैरे नाव नका हो देऊ याला. आपण मस्त गप्पा मारू. चार मिसळ आण रे..." विदा पोर्याला ऑर्डर देता देता, हसत म्हणाला.
"संध्याकाळी मिसळ?" मी चटकन बोलून गेलो.
"हात्तिच्या त्यात काय? मिसळ पेटवायला काही काळ वेळ असतो का?" लोकेश पोटावर हात फिरवता म्हणाला.
पण मुलाखतीला त्यांनी लगेच होकार दिल्याने मलाही बरं वाटलं. नाहीतर, मुलाखत किंवा Interview म्हटल्यावर लोकांच्या ज्या काही प्रतिक्रिया असतात ना, काही विचारू नका.
"धन्यवाद." मी स्माईल देत म्हणालो.
"सॉरी, पण तुम्ही नक्की काय बोलत होतात? जरा सांगाल काय?"
"प्रत्येक वाक्याला सॉरी म्हणायची सवय आहे का तुझी? झाली की आता ओळख. सॉरी बिरी नको." अर्चिस एकवचनावर येत म्हणाला. दोन-चार वाक्यातच त्याने मला मित्र करून टाकलं.
"बरं, सांगतो आता आमच्याबद्दल. We are founders of Twine Outdoors. आम्ही टूरीझम क्षेत्रात काम करतो." गरम चहाचा कप हातात घेत अर्चिस म्हणाला.
"मराठी माणूस आणि धंदा हे समीकरण बर्याच जणांना जरा अवघड वाटते. पण धंद्यासाठी लागणारे सगळ्यात मोठे भांडवल म्हणजे डो़के आणि त्याहूनही अधिक महत्त्वाचे म्हणजे बरोबरची माणसे. आमच्याकडे दोनही गोष्टी होत्या, त्यामुळे ठरवले की Business करायचाच.." एका दमात विदा म्हणाला.
"अगदीच पुस्तकी वाटत नाहिये ना?" मी काही बोलणार त्याआधीच त्याने माझी विकेट काढली.
"नाही नाही तसं काही नाही, तुम्हाला जे वाटेल ते बोला." मी हसत ऊत्तर दिलं.
"बाय द वे, सुरूवातीला काही कुसक्या कांद्यांनी आमची थट्टापण केली. पण अशांकडे दुर्लक्ष करणं फार सोयीचं असतं." लोकेश.
"बरं, आम्ही तिघे CA, बरेच जण आम्हाला 3 Idiots म्हणतात. आणि खरं सांगायचं तर आम्हालाही ते आवडत. Its really feels better to be an Idiot Chartered Accountant...!"
"मुळातच आम्हाला भटकायची प्रचंड आवड आहे. प्रचंड म्हणजे अगदी राक्षसी. जंगलाबद्दल तिघांनाही आकर्षण आहे. मग काय.. एकदा अशाच एका संगमेश्वर जवळच्या डोंगरावर करवंद खाताना आमची ओळख झाली. ती पण एक भारीच गोष्ट आहे. पण ती नंतर कधीतरी. हा तर, एका ओळखीतच आम्ही मित्र झालो आणि हा हा म्हणता बरीच जंगलं एकत्र सर केली. तिघे भारतभर फिरलो. तुमचा विश्वास नाही बसणार पण असंच एकदा आम्ही नागझिर्याला गेलो होतो तेव्हा तिघांच्याही डोक्यात एकदम विचार आला, की या क्षेत्रातच आपण धंदा का करू नये? एक वेगळेपण कोणाला नाही आवडत?" अर्चिस चहा फुर्र् फुर्र् करत म्हणाला.
"म्हणूनच Wildlife Tourism म्हणजेच आमच्या भाषेत Live Tourism किंवा Dynamic Tourism. जर फिरायची आवड असेल तर वेळेचं आणि त्याहून जागेचं बंधन रहात नाही. आणि आमचंही तसंच होतं, म्हणून Tourism Beyond Boundaries. आणि काहीही झालं तरी 'छोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे' अशी आमची मैत्री. आम्हाला एकत्र फिरायला हे जगही अगदी लहान आहे. या वास्तवातूनच जन्माला आलं आमचं नाव, Together, World Is Not Enough, TWINE, TWINE Outdoors." विदा अगदी excite होऊन म्हणाला.
"जन्माला आलेलं हे बाळ हळू हळू बाळसं धरू लागलं. Wildlife बरोबरच Corporate Outing आणि Concept Tours या शाखादेखील सुरू झाल्या आणि ते बाळ दुडू दुडू धावूही लागलं." लोकेश म्हणाला.
"ए...ए... फार सेंटी होतंय हे. रडू का मी आता?" अचानक विदा अक्षरशः ओरडला. पण त्याच्या चेहर्यावरचा मिश्किलपणा काही जात नव्हता.
"पण काय करणार असंच काहिसं झालं आहे आपल्याबरोबर... आणि मुलाखत देतोय ना.. जरा अलंकारीक का काय ते बोलायला नको?" लोकेश डोळे मोठे करत म्हणाला.
मी फक्त समोर जे काही चाललं होतं त्याची मजा घेत होतो. मला वेगवेगळे प्रश्न विचारून ऊत्तरं काढून घ्यायची गरजच भासत नव्हती. कोण म्हणतो कपाळावर आठ्या आणूनच बिझनेस करता येतो? कोण म्हणतो मित्रांना सोबत घेऊन बिझनेस करता येत नाही?
"आम्ही Wildlife शाखेअंतर्गत, भारतभर, Wildlife Tours, Nature Tours आणि Monsoon Treks अशा निसर्गाच्या सान्निध्यातल्या टूर्स करतो. आम्हालाही जंगलाच्या जवळ रहाता येतं आणि लोकांनाही कधिही न बघितलेल्या गोष्टी बघायला मिळतात. आमच्याबरोबर अगदी पहिल्यांदा आलेले Twiners, म्हणजे कावळा, चिमणी आणि कबूतर एव्हढेच पक्षी माहित असलेले लोक, आता बघताक्षणी जवळजवळ कुठलाही पक्षी ओळखतात." विदा अगदी अभिमानाने सांगत होता.
"माणसं आणि पर्यावरण जपणं हा आमचा मोटो आहे. Twine ची टूर जिथे जाईल तिथल्या वातावरणाला आणि जैव-विविधतेला काहीही त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी आम्ही घेतो. आणि माणसं जोडण्या आणि जपण्याबद्द्ल सांगायचं तर प्रत्येक टूर झाल्यावर, Twiners ची आमच्याशी आणि एकमेकांशी अगदी घट्ट मैत्री होते. अगदी लंगोटी यारांसारखी. आणि मग टूरनंतर, फेसबूक आणि व्हॉट्सअॅपवर अगदी कल्ला चालू असतो." लोकेश म्हणाला
" 'Wildlife Tourism म्हणजे फक्त जवळून वाघ बघणे' ही समजूत किती चुकीची आहे हे सगळ्या Twiners ना आता माहिती झालंय. आणि त्यामुळेच आमचे Twiners अगदी मनसोक्तपणे जंगल अनुभवतात. समोर येणार्या प्रत्येक प्राणी, पक्षी आणि झाडाचा आस्वाद घेतात. आणि अगदी खरं सांगतो, समाधान का काय जे म्हणतात ना ते हेच." विदा आता खरंच जरा सेंटी झाला होता.
"Responsible Tourism हेच खरं Wildlife Tourism. हा आमचा फंडा आहे." लोकेशही जरा गंभीर होत म्हणाला.
"चहा थंड होतोय तुझा. मध्ये मध्ये जाऊदे तोपण घशात. बाय द वे, Corporate Outing बद्दलही जरा सांगतो." अर्चिसने मूड चेंज केला.
"Corporate Outing मधून वेगवेगळ्या companies मधल्या टीम्सच्या outbound events, picnics, trips आणि team building events आम्ही सुरू केल्या. Corporate Outing ला आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. पिरामल, Barclays, Deutsche Bank, Citiustech अशा बर्याच corporates च्या टीम्स आम्ही नेल्या. पण पुढच्या काळात आम्ही या शाखेवर अजून जास्त लक्ष केंद्रित करणार आहोत."
एव्हाना मिसळही आली होती. पण माझं सगळं लक्ष त्यांच्या बोलण्याकडेच होतं.
"आणि आमची तिसरी विंग, Concept Tours! Concept Tours is something unique to us. टुरिझमची जी चौकट आहे, त्याबाहेर जाऊन या टूर्स होतात. वेगवेगळ्या themes आणि नाती यांवर या टूर्स असतात. 'Day out with Dad' या आमच्या टूरला जे जे Twiners आले आहेत ते कधिही भेटले तरी पहिली त्याचीच आठवण काढतात. आईला घरीच टाटा करून फक्त बाबांबरोबर फिरायला जाऊन लहान मुलं जी काही खूष होतात, ते अगदी बघण्यासारखं असतं. आणि मनसोक्त मस्तीही करायला मिळते." पुन्हा डोळे मोठे मोठे करत लोकेश म्हणाला.
"मिसळ संपवल्याशिवाय पुढची मुलाखत मिळणार नाहीये हा तुला !!" आता विदाही अरे तुरे वर आला.
"अजून एक सांगायचं तर 'लहाणपण देगा देवा' या टूरमध्ये सगळी सिनिअर मंडळी अगदी लहान होऊन खेळतात. मजा येते!" अर्चिस मिसळ हाणत म्हणाला.
"आज तीन वर्षे झाली आणि हा प्रवास उत्तम चालू आहे. तिघांनी रोवलेल्या या रोपाचा आता हळूहळू वृक्ष होत आहे. वर्षाला साधारण पाच-सहाशे लोकं आमच्या टूर्सना येतात. आणि आमचं वेगळेवण अनुभवतात." जरासा थांबून विदा म्हणाला.
मी खरोखर खूष झालो होतो. दिवसभराची कटकट, थकवा गायब झाला होता. हे तिघे माझ्यासारख्या अनोळखी माणसाला अगदी बिनधास्त आणि प्रचंड ऊत्साहाने त्यांच्या venture बद्दल सांगत होते.
"पुढचा काय प्लॅन आहे तुमचा Twine साठी?" मीपण मिसळीचा शेवटचां घास उडवत विचारलं.
"प्रत्येक सिझनला नेहमीच्या टूर्स बरोबरच २-३ नवीन ठिकाणी, आणि २-३ नवीन प्रकारच्या टूर्स करण्याचा आमचा प्रयत्न असतो. त्यामुळे अगदी येत्या ऊन्हाळी सिझनबद्द्ल बोलायचं तर ताडोबा, नागझिरा, पेंच, रणथंबोर, बांधवगड, गिर यांबरोबरच कान्हा आणि दक्षिणेतलं नागरहोळ या दोन नवीन ठिकाणीही wildlife tours नेणार आहोत." लोकेश हातातला कॅमेरा हलवत म्हणाला.
"आणि Concept टूर्सअंतर्गत 'Day Out with Dad' आणि 'लहाणपण देगा देवा' बरोबरच 'Foodies Day Out', 'सफर-ए-दूर्ग' अशा टूर्स नेणार आहोत. अनेक प्रायोगिक टूर्सपण करणार आहोत. नात्यांना घट्ट करणार्या Relationship टूर्सही नजिकच्या काळात नेणार आहोत. आणि तुला सांगतो, जर तुझ्याकडेसुद्धा एखादा वेगळा Concept असेल तर नक्की सांग. तोही घेऊन जाऊ. या टूर्समध्ये म्हणजे अगदी.. Playground is open !!" अर्चिस जवळजवळ खिदळतच होता.
"वेगळेपण आणि आपलेपण हा आमचा USP आहे. त्यामुळे येत्या काळात जास्तीत जास्त वेगळ्या प्रकारच्या टूर्स आम्ही आणणार आहोत. सध्या सर्व भारतभर आम्ही टूर्स नेतोच; लवकरच परदेशातही Wildlife टूर्स नेण्याचा इरादा आहे. Concept tour मध्ये नवनवीन टूर्स नेणारं Twine Outdoors हे एकमेव नाव आहे आणि राहील. Corporate शाखेमध्ये अधिकाअधिक corporates ना सेवा पुरवण्याचा ऊद्देशही डोळ्यासमोर आहेच. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही करायचंय ते सगळं माणसं जपूनच." अर्चिस अगदी भारावून गेला होता.
या एका चहा आणि मिसळीवर झालेल्या छोट्याश्या पण अगदी रोमांचक भेटीला आता महिनाभर झाला. परवाच मी बारामतीजवळच्या भिगवणला Twine Outdoors बरोबर त्यांच्या 'Waders Special' टूरलाही जाऊन आलो. पक्षीनिरिक्षणाबरोबरच जी काही धमाल आम्ही केलीय ती शब्दांत सांगणं कठीण आहे. पण नुसतं घरगुती आपलेपणंच नाही तर, टूर हाताळण्यामध्ये या लोकांचा प्रोफेशनल टच, हातखंडा एकदम वाखाणण्यजोगा आहे.
हे नक्कीच पुढे जातील. या 3 Idiots चा हा प्रवास असाच चालत राहील आणि Twine Outdoors चा लवकरच वटवृक्ष होईल यात मला काहीही शंका नाही !
==========================
No comments:
Post a Comment